आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरवाजात बसण्यासाठी वृद्धाने धावत्या रेल्वेतून ढकलले, तरूण जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- दारावर उभ्या असलेल्या तरुणास मागे उभ्या असलेल्या वृद्धाने धावत्या रेल्वेतून ढकलून दिल्याची घटना जळगाव रेल्वेस्थानकापासून १०० मीटर अंतरावर रविवारी दुपारी १२ वाजता घडली. रेल्वे थांबताच मित्राने २ किलोमीटर मागे धावत जाऊन रुळात पडलेल्या जखमीला रुग्णालयात नेऊन उपचार केल्याने तो सुदैवाने बचावला आहे. 

 

पंकज चरडे (२४, रा.वर्धा) व मित्र आरिफ शेख हे शनिवारी रात्री वर्धाहून खरेदीसाठी जळगावात आले होते. रविवारमुळे अनेक दुकाने बंद असल्याने ते दुपारी रेल्वेने परतीला निघाले. रेल्वेत प्रचंड गर्दी असल्याने दाेघेही दरवाजात उभे राहिले. पंकजच्या मागे उभ्या असलेल्या वृद्धाने खाली बसण्याचा प्रयत्न केला आणि पंकज खाली पडला. 

बातम्या आणखी आहेत...