आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • To Improve The Memory Of The Students In The Schools Of Haryana, Lift Up The Ears

स्मरणशक्ती चांगली करण्यासाठी हरियाणातील शाळांत विद्यार्थ्यांना कान पकडून काढायला लावणार उठाबशा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिवानी  - मेंदू ताजातवाना आणि शरीर सदृढ ठेवण्यासाठी हरियाणातील शालेय मुलांना कान पकडून उठाबशा काढायला लावणार आहेत. प्रार्थनेनंतर शिक्षा म्हणून नव्हे, तर योग म्हणून या उठाबशा काढाव्या लागणार आहेत. हरियाणा शालेय शिक्षण मंडळाचे सचिव राजीव प्रसाद यांनी सांगितले की, ही प्रक्रिया सुपर ब्रेन योगा आहे. योगदिनी योग तज्ज्ञांशी झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. भिवानी येथील सर्वपल्ली राधाकृष्णन लॅब स्कूलमध्ये हरियाणा शालेय शिक्षण मंडळ हा प्रयोग या शैक्षणिक सत्रापासून राबवणार आहे. गुरुवारपासून याबाबत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आठ जुलैपासून शाळा सुरू होत आहेत, तेव्हा सुमारे ७०० विद्यार्थ्यांना दोन गटांत विभागले जाणार आहे.  एका गटाला योग करायला लावणार, तर दुसऱ्या गटाला नाही. दोन्ही गटांतील विद्यार्थ्यांचे वैज्ञानिक दृष्टीने निरीक्षण केले जाईल. योग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर प्रयोगाचा सकारात्मक  परिणाम दिसला तर पुढील सत्रापासून राज्यातील सर्व शाळांत हे लागू केले जाईल. प्रसाद यांनी सांगितले की, सुपर ब्रेन योगामुळे कानाखालील अॅक्युप्रेशर बिंदू सक्रिय होऊन मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते. यामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती चांगली होईल. सुपर ब्रेन योगात उजव्या हाताने डावा, तर डाव्या हाताने उजवा कान पकडून उठाबशा काढतात. १० ते १२ उठाबशा काढताना श्वासावर नियंत्रण ठेवावे लागते. यामुळे मेंदूच्या दोन विभागांचे संतुलन होते. या प्रक्रियेमुळे मेंदूत अल्फा लहरी निघतात, त्या मेंदूला अत्यंत क्रियाशील बनवतात. या प्रक्रियेमुळे मेंदूचा कोणतीही माहिती ग्रहण करण्याचा वेग वाढतो आणि अनेक विकार दूर राहतात.  हे अल्फा तरंग सृजनात्मक कार्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण करतात. त्या वेळी मेंदू माहितीचे ग्रहण करण्यासाठी किंवा प्रसारित करण्यासाठी अत्यंत क्रियाशील होतो आणि हळूहळू मेंदूच्या सर्व प्रणालीमध्ये सामंजस्य येते. 
 

 

पहिल्या चुकीसाठी ही शिक्षा यासाठी...
उठाबशांची शिक्षा प्राचीन काळापासून खोडकर किंवा कमी एकाग्रता असलेल्या विद्यार्थ्यांना दिली जायची. याचा हेतू मेंदूचे संतुलन होऊन स्मरणशक्ती वाढवणे असा होता. तसेच मेंदूचे कार्य सुधारून शारीरिक आणि मानसिक आजारांचे प्रमाण कमी होते.