आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजोबांच्या पुण्यतिथीसाठी होणारा अनावश्यक खर्च टाळून नातवाने 108 गरजू विद्यार्थ्यांना स्वखर्चातून केल्या सायकल वाटप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पापरी- आजोबांच्या पुण्य तिथीसाठी करण्यात येणारा अनावश्यक खर्च टाळून कामती बुद्रुक (ता. मोहोळ) येथील सर्जेराव रामराव भोसले - पाटील यांनी आपल्या दादाश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावातील वाड्या वस्त्यांवर राहून शाळेसाठी चालत गावात येणाऱ्या 108 गरजू विद्यार्थ्यांना सुमारे पाच लाख रुपये किमतीच्या सायकलचे वाटप करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 61 जणांनी रक्त दानही केले.
कामती बुद्रुक येथील ज्येष्ठ नागरिक केरबा भोसले पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रत्येक वर्षी दादाश्री प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबवण्यात येतात. यावर्षी सर्जेराव भोसले-पाटील यांनी यासाठी होणारा अनावश्यक खर्च टाळून गावातील शाळेत शिकणाऱ्या कामती बुद्रुक येथील लांबून चालत शाळेला येणाऱ्या विद्यार्थ्याची यादी शाळेतून मागवून त्यातून विद्यार्थी आणि  विद्यार्थीनी यांना एकूण सुमारे पाच लाख रुपयांच्या 108 सायकलीचे वाटप स्वखर्चातून मान्यवरांच्या उपस्थितीत केले.

यावेळी लोक शक्ती शुगरचे अध्यक्ष व जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष मनोहर डोंगरे, लोक शक्ती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील, कामतीचे सरपंच रामराव भोसले-पाटील, ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज, शिवसेना नेते प्रकाश वानकर, भीमाचे माजी संचालक नानासाहेब डोंगरे, मोहोळ नागरीचे संचालक पंडित निकम, सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण उंदरे, चंद्रकांत कस्तुरे, औदुंबर जाधव, माजी सरपंच सदाभाऊ कोकरे, ज्ञानेश्वर इंगोले,
 सर्जेराव भोसले पाटील, बालाजी भोसले पाटील, जयसिंग आवताडे, प्रकाश आवताडे, रमेश आवताडे, दत्ता पाटील प्रशांत निकम, संतोष पाटील, शिवाजी गुंड, तानाजी गुंड, आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...