आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयाेध्येकडे कूच करण्यासाठी सेनेने नाशिकमधून केली संपूर्ण रेल्वे 'बुक';200 खाेल्यांचीही व्यवस्था

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - हिंदुत्व आणि राम मंदिराचा मुद्दा हाती घेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबरला 'चलो अयोध्या'ची हाक दिली असून त्यास प्रतिसाद देत नाशिकमधून २५०० शिवसैनिक अयाेध्येत जाण्याची तयारी करीत अाहेत. इतकेच नाही तर सेनेने नाशिकराेड रेल्वेस्थानकावरून २३ नाेव्हेंबरला रात्रीची संपूर्ण रेल्वेच बुक केली अाहे.

 

त्यासाठी सुमारे ३० लाखांचा खर्च येणार असून ताे पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात येणार अाहे. अयाेध्येत नाशिककरांना राहण्यासाठी पक्षाच्या वतीने २०० खाेल्यांची अागाऊ नाेंदणी करण्यात अाली अाहे.येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी भाजपची कोंडी करण्यासाठी अयोध्या भेटीची घोषणा केली अाहे. सेनेच्या दसरा मेळाव्यात 'चलाे अयाेध्या'चा नारा देण्यात अाला अाहे. पक्षाने केलेल्या नियाेजनानुसार २५ ला जाहीर सभा हाेणार असून. याच दिवशी उद्धव यांच्या हस्ते राम मंदिराची वीट रचली जाणार अाहे. २६ ला शरयू नदीची महाअारती करण्यात येणार अाहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी नाशिकमधून माेठ्या प्रमाणात शिवसैनिक नेण्याचे नियाेजन सुरू असून त्यासाठी अातापासून नावनाेंदणी सुरू अाहे. एका संपूर्ण रेल्वेची बुकिंगही सेनेच्या वतीने करण्यात अाली अाहे. त्यात १६ स्लीपर काेच डबे असतील.

 

शिवसैनिकांना भगव्या टाेप्या अाणि टी-शर्ट : अयाेध्येला जाणाऱ्या शिवसैनिकांना भगव्या टाेप्या अाणि टी-शर्ट देण्याचेही नियाेजन सुरू अाहे. त्याचप्रमाणे भगवे झेंडेही ठिकठिकाणी फडकविण्यात येणार अाहेत. २५ अाणि २६ नाेव्हेंबरला अयाेध्येत माेठ्या प्रमाणात शिवसैनिक दाखल हाेणार अाहेत. त्यामुळे तेथील हाॅटेल्स अाजपासूनच बुक झाल्या अाहेत. यात नाशिककर शिवसैनिकांसाठी हाॅटेलच्या २०० खाेल्या बुक करण्यात अाल्या अाहेत.


युद्धपातळीवर नियाेजन सुरू
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अादेशान्वये अयाेध्येत कूच करण्यासाठी शिवसैनिक उत्सुक अाहेत. नाशिक हा सेनेचा बालेकिल्ला असल्याने येथून माेठ्या प्रमाणात शिवसैनिक दाखल हाेतील. साधारणत: १२५४ शिवसैनिक नाेंदणी केलेल्या रेल्वेने व उर्वरित रस्ते मार्गाने दाखल हाेतील. यासाठी पक्षाच्या वतीने युद्धपातळीवर नियाेजन सुरू अाहे. - हेमंत गाेडसे, खासदार, शिवसेना

बातम्या आणखी आहेत...