आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • To Save His Farm, The Son Of A Farmer Sets Up His Family For Sale, Plagued By Three Years Of Constant Barren ...

शेती वाचवण्यासाठी शेतकरी पुत्राने आपले कुटुंब काढले विक्रीस, तीन वर्षांपासूनच्या सततच्या नापिकीने त्रस्त...

2 वर्षांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

कोळगाव (वाशीम) : शेती वाचवण्यासाठी कोणताही पर्याय न उरल्यामुळे शेतकरीपुत्राने चक्क आपले कुटुंब विक्रीला काढले आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात मागील तीन वर्षांपासून सततची नापिकी होत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. मागील सरकारने कर्जमाफी करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्याचा सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. आता राज्यात नव्याने महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसाने झालेल्या पिकांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देणार म्हणून जाहीर केले होते. मात्र, दोन महिने उलटत आले तरी अजून ही ती मदत मिळाली नाही. त्यामुळे वाशीम जिल्ह्यातील कोळगाव येथील विजय शेंडगे या शेतकरी पुत्राने आपल्या शेतात फलक लावून चक्क आपले कुटुंब विक्रीला काढले आहे. 'कुटुंब विकत घ्या मात्र माझी शेती वाचवा' अशी आर्त याचना या शेतकरीपुत्राने सरकारला केली आहे.

मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील शेतकरी पुत्र विजय शेंडगे यांच्या आजोबांच्या नावावर ७ एकर कोरडवाहू शेती आहे. या शेतीवर ४ लाख पन्नास हजार रुपये कर्ज आहे. मागील तीन वर्षांपासून दुष्काळ आहे. या परिस्थितीत पीक विमा भरूनही त्याचा कोणताही मोबदला मिळाला नसल्याने हताश होऊन शेती जगवण्यासाठी कुटुंब विक्रीला काढले असल्याचे विजय शेंडगे सांगितले.

'कुटुंब विकत घ्या मात्र माझी शेती वाचवा' शेतकरीपुत्राची आर्त हाक

या हिवाळी अधिवेशनात हे सरकार शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावेल असे वाटत असताना, या सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील की नाही, असा प्रश्न आहे. आमच्यासमोर कोणताही मार्ग न उरल्याने व जगावे कसे, या चिंतेत आम्ही कुटुंब विक्रीला काढले आहे.

नापिकी, वर कर्जाचे ओझे

सततच्या नापिकीने व शेती कर्जामुळे जगणे कठीण होऊन बसल्याने शेतकरी आत्महत्येचा विचार करीत आहे. त्यातच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने बळीराजा अस्वस्थ आहे.

तहसील, विमा कंपन्यांनीही बोळवण केल्याने अडचण

शेतातील पिकांचे अवकाळी पावसामुळे दीड महिन्यापूर्वी नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून त्यांनी संबंधित विमा कंपनीकडे निवेदनाद्वारे मदतीची मागणी केली. मात्र, त्यांना तेथे पैशांची मागणी झाली. त्यानंतर त्यांनी याबाबत तहसीलदारांकडे याबाबत तक्रारवजा निवेदन दिले. तेथेही त्यांच्या निवेदनाची दखल न घेतली नाही. त्यामुळेच आपण शेती वाचवण्यासाठी कुटुंब विक्रीस काढण्याचा पर्याय निवडला, असे कोळगाव येथील शेतकरी विजय शेंडगे यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले.
 

बातम्या आणखी आहेत...