आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुदानमध्ये नागरी प्रशासन स्थापन करण्यासाठी लष्करी परिषदेविरुद्ध राष्ट्रव्यापी आंदाेलन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खार्तुम - सुदानची राजधानी खार्तुम येथील बँक आॅफ खार्तुमबाहेर हजाराे सुदानी कर्मचारी मंगळवारी आंदाेलन केले. देशात नागरी प्रशासन लागू करण्याच्या मागणीसाठी लष्करी परिषदेविरुद्ध कर्मचाऱ्यांनी दाेन दिवसांचे राष्ट्रव्यापी आंदाेलन पुकारले आहे. आंदाेलनामुळे हवाई व बस वाहतुकीवर परिणाम झाला. नव्या सरकारच्या रचनेत लष्करी प्रशासन असावे की नागरी प्रशासन या मुद्यावर अम्ब्रेल्ल प्राेटेस्ट मूव्हमेंटचे नेते व लष्करी अधिकाऱ्यांत तणाव आहे. लष्कराने एप्रिल महिन्यात राष्ट्राध्यक्ष आेमर-अल बशीर यांना पदच्युत केले आहे. बंद हे पहिले पाऊल असून आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही सविनय कायदेभंग करू ,असा इशारा बँकर युसूफ माेहंमद यांनी या वेळी दिला. आम्ही लष्करी सरकारचा अनुभव घेतला, परंतु सुदानमध्ये ते साेईचे ठरत नसल्याचे माेहंमद म्हणाले. पाेर्ट सुदानमध्येही शेकडाे लाेक आंदाेलनात सहभागी झाले आहेत.

 

विमानसेवा निलंबित - 

सुदानी एअरलाइन्स बद्र, टार्काे व नाेव्हा यांनी विमान सेवा निलंबित केली अाहे. इजिप्त एअरनेही खार्तुमकडे जाणारी विमान उड्डाणे मंगळवारी राेखली. याशिवाय खार्तुमच्या मध्यवर्ती बस स्थानकात शेकडाे प्रवासी अडकल्याचे दृश्य हाेते.

बातम्या आणखी आहेत...