आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

12 पैकी 3 राशींसाठी आजचा दिवस खास आहे

  •  

दिव्य मराठी वेब टीम

Apr 15,2019 12:01:00 AM IST

आजच्या दिवशी राहू काळ सकाळी ७.३० ते ९.०० वाजेपर्यंत राहणार आहे. दिशा शूल पूर्वेस राहील. आजचा दिवस एकूणच 12 पैकी 3 राशींसाठी खास राहील. उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य ठरेल.

मेष: शुभरंग: जांभळा| अंक:९ आज अती आत्मविश्वासाने नुकसान होईल. तरूण मंडळींचे वर्तन बेशिस्तपणाचे असेल. आज आपल्या मर्यादा अोळखून, कायद्यात रहाणे गरजेचे आहे.वृषभ: शुभरंग: मरून| अंक:४ आज तुम्ही फक्त कौटुंबिक प्रश्न साेडवण्यास प्राधान्य द्याल. मातोश्रींकडून काहीतरी लाभ होण्याची शक्यता आहे. मुलांचे फाजिल लाड बंद करावे लागतील.मिथुन : शुभ रंग : पिस्ता| अंक : ५ महत्वाच्या कामासाठी भटकावे लागणार आहे. काही निर्णय आज झटपट घ्यावे लागतील. एखाद्या कामासाठी आज शेजाऱ्यांची मदत होईल. प्रकृतीवर ताण पडेल.कर्क: शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ८ आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करून दाखवाल. खिशात पैसा खेळता असल्याने कार्यक्षमता वाढेल. चांगली माणसे संपर्कात येतील. मित्रवर्गाचे सहकार्य उत्तम राहील.सिंह: शुभ रंग : पांढरा | अंक : ३ तुमच्या प्रभावी वक्तृत्वाचा समोरील व्यक्तीवर प्रभाव पडेल. आज तुमच्या नेतृत्वगुणांस वाव मिळेल. आज जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.कन्या : शुभ रंग : सोनेरी | अंक : १ कंजूषपणा बाजूस ठेऊन आज आवश्यक खर्च करावाच लागणार आहे. काही प्रसंगी संयमाची कसोटी राहील. वडीलधाऱ्या मडळींचे विचार समजून घ्यावे लागतील.तूळ : शुभ रंग : गुलाबी | अंक : २ कार्यक्षेत्रातील अडचणी दूर होत असल्याचे जाणवेल. विरोधकही सहकार्याचा हात पुढे करतील. लाभातील चंद्र आर्थिक सुबत्ता देणारच आहे. छान दिवस.वृश्चिक : शुभ रंग : भगवा | अंक : ६ नोकरीच्या ठीकाणी अधिकारात वृध्दी होईल. तुम्ही जीव ओतून काम कराल. रिकामटेकड्या वादविवादात मात्र आज तटस्थ रहा. मित्रांना उद्याच यायला सांगा.धनू : शुभ रंग : राखाडी | अंक : २ काही कारणास्तव मानसिक अस्वस्थता जाणवेल. घरातील थोरांशी जमवून घेणे कठीणच जाईल. आज गरजेपुरतेच बोलणे हिताचे. सत्संगाची ओढ लागेल.मकर : शुभ रंग : आकाशी | अंक : ७ आज स्वत:चेच चालवण्याचा अट्टहास न करता काही निर्णय अनुभवींच्या सल्ल्याने घेणे गरजेचे राहील. आज जोखमीची कामे टाळलेली बरी. वाहन हळू चालवा.कुंभ : शुभ रंग : नारिंगी | अंक : ५ कोणत्याही क्षेत्रात असलात तरी आज स्पर्धा अटळ आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलावणे येईल. स्पर्धकांना कमजोर समजू नका.मीन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९ कष्टांच्या प्रमाणात मोबदलाही चांगला मिळेल. हितशत्रूंचा उपद्रव मात्र वाढणार आहे. सतर्क रहा. द्विधा मन:स्थिती असताना महत्वपूर्ण निर्णय टाळा.

मेष: शुभरंग: जांभळा| अंक:९ आज अती आत्मविश्वासाने नुकसान होईल. तरूण मंडळींचे वर्तन बेशिस्तपणाचे असेल. आज आपल्या मर्यादा अोळखून, कायद्यात रहाणे गरजेचे आहे.

वृषभ: शुभरंग: मरून| अंक:४ आज तुम्ही फक्त कौटुंबिक प्रश्न साेडवण्यास प्राधान्य द्याल. मातोश्रींकडून काहीतरी लाभ होण्याची शक्यता आहे. मुलांचे फाजिल लाड बंद करावे लागतील.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता| अंक : ५ महत्वाच्या कामासाठी भटकावे लागणार आहे. काही निर्णय आज झटपट घ्यावे लागतील. एखाद्या कामासाठी आज शेजाऱ्यांची मदत होईल. प्रकृतीवर ताण पडेल.

कर्क: शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ८ आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करून दाखवाल. खिशात पैसा खेळता असल्याने कार्यक्षमता वाढेल. चांगली माणसे संपर्कात येतील. मित्रवर्गाचे सहकार्य उत्तम राहील.

सिंह: शुभ रंग : पांढरा | अंक : ३ तुमच्या प्रभावी वक्तृत्वाचा समोरील व्यक्तीवर प्रभाव पडेल. आज तुमच्या नेतृत्वगुणांस वाव मिळेल. आज जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.

कन्या : शुभ रंग : सोनेरी | अंक : १ कंजूषपणा बाजूस ठेऊन आज आवश्यक खर्च करावाच लागणार आहे. काही प्रसंगी संयमाची कसोटी राहील. वडीलधाऱ्या मडळींचे विचार समजून घ्यावे लागतील.

तूळ : शुभ रंग : गुलाबी | अंक : २ कार्यक्षेत्रातील अडचणी दूर होत असल्याचे जाणवेल. विरोधकही सहकार्याचा हात पुढे करतील. लाभातील चंद्र आर्थिक सुबत्ता देणारच आहे. छान दिवस.

वृश्चिक : शुभ रंग : भगवा | अंक : ६ नोकरीच्या ठीकाणी अधिकारात वृध्दी होईल. तुम्ही जीव ओतून काम कराल. रिकामटेकड्या वादविवादात मात्र आज तटस्थ रहा. मित्रांना उद्याच यायला सांगा.

धनू : शुभ रंग : राखाडी | अंक : २ काही कारणास्तव मानसिक अस्वस्थता जाणवेल. घरातील थोरांशी जमवून घेणे कठीणच जाईल. आज गरजेपुरतेच बोलणे हिताचे. सत्संगाची ओढ लागेल.

मकर : शुभ रंग : आकाशी | अंक : ७ आज स्वत:चेच चालवण्याचा अट्टहास न करता काही निर्णय अनुभवींच्या सल्ल्याने घेणे गरजेचे राहील. आज जोखमीची कामे टाळलेली बरी. वाहन हळू चालवा.

कुंभ : शुभ रंग : नारिंगी | अंक : ५ कोणत्याही क्षेत्रात असलात तरी आज स्पर्धा अटळ आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलावणे येईल. स्पर्धकांना कमजोर समजू नका.

मीन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९ कष्टांच्या प्रमाणात मोबदलाही चांगला मिळेल. हितशत्रूंचा उपद्रव मात्र वाढणार आहे. सतर्क रहा. द्विधा मन:स्थिती असताना महत्वपूर्ण निर्णय टाळा.
X
COMMENT