Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Today 16 April's horoscope

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 16, 2019, 12:01 AM IST

12 पैकी 5 राशींसाठी आजचा दिवस खास आहे

 • Today 16 April's horoscope

  आजच्या दिवशी राहू काळ सकाळी ३.०० ते ४.३० वाजेपर्यंत राहणार आहे. दिशा शूल उत्तरेस असेल. आजचा दिवस एकूणच 12 पैकी 5 राशींसाठी खास राहील. उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य ठरेल.

 • Today 16 April's horoscope


  मेष : शुभ रंग : जांभळा|अंक : ६
  आज खिशात पैसा खुळखुळेल. तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. एखाद्या समारंभात आत्मविश्वासाने वावराल. मोठेपणा जपाल.

 • Today 16 April's horoscope

  वृषभ : शुभ रंग : मरून|अंक : ८ 
  आज हातचे सोडून मृगजळामागे धावायचा मोह होईल. काही चुकीचे सल्ले देणारी माणसे भेटतील. कोणताही निर्णय घेताना जोडीदाराचा सल्ला घ्या.

 • Today 16 April's horoscope

  मिथुन : शुभ रंग : पांढरा| अंक : ९
  अति उत्साहाच्या भरात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावर ढकललेले बरे. वडीलधाऱ्यांचे उपदेश ऐकून घ्या.

 • Today 16 April's horoscope

  कर्क :  शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ७
  कितीही पैसा आला तरी तो जाण्याचे मार्गही आधीच तयार असतील. जमाखर्चाचा तराजू समतोलच राहील.देण्याघेण्याचे व्यवहार चोख ठेवा. कुसंगती टाळाच.

 • Today 16 April's horoscope

  सिंह : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५ 
  नोकरीत कामाशी प्रामाणिक असाल. आज आपले काम सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी गौण असतील. वरिष्ठही तुमच्या अडचणी समजून घेतील.

 • Today 16 April's horoscope

  कन्या : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३
  उद्योगधंद्यात मेहनत व चिकाटीच कामी येईल. मोठी स्वप्ने बघताना वास्तवाचे भान असणेही गरजेचे आहे. दुपारनंतर एखाद्या अनुकूल घटनेने उत्साह वाढेल. 
   

 • Today 16 April's horoscope

  तूळ : शुभ रंग : केशरी | अंक : १
  काही मनाविरुद्ध घटनांनी बेचैन व्हाल. आज कुणाकडे सल्ले मागत बसू नका. आज तुम्हाला एकांताची तसेच सत्संगाची गरज भासेल. 

 • Today 16 April's horoscope

  वृश्चिक : शुभ रंग : मोतिया | अंक : ४
  उद्योगधंद्यातील महत्त्वपूर्ण करार मदार यशस्वी होतील. आज संध्याकाळचा वेळ फक्त कुटुंबीयांसाठी राखीव ठेवाणे हिताचे. वैवाहिक जीवनात आज तू तिथे मी.

 • Today 16 April's horoscope

  धनू :  शुभ रंग : डाळिंबी | अंक : २
  कार्यक्षेत्रात पेचप्रसंगांना सामोरे जावे लागेल. काही प्रसंगी अडला हरी....या म्हणीचा प्रत्यय येईल. आज वैवाहिक जीवनात तुझंच खरं म्हणणे हिताचे.
   

 • Today 16 April's horoscope

  मकर : शुभ रंग : पांढरा | अंक : ३
  कार्यक्षेत्रात प्रगतिपथावर राहून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करता येईल. आवडत्या व्यक्तीच्या सहवासात आजचा संध्याकाळचा वेळ मजेत जाईल.
   

 • Today 16 April's horoscope

  कुंभ : शुभ रंग : लाल  | अंक : ६
  आज तुम्ही आपले आवडते छंद व व्यासंग जपण्यासाठी आवर्जून वेळ कढाल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटीत जुन्या स्मृतींना उजाळा द्याल. गृहाेद्योग तेजीत चालतील.

 • Today 16 April's horoscope

  मीन : शुभ रंग : मोरपंखी  | अंक : ९
  थोड्याफार कौटुंबिक कटकटींवर जोडीदाराच्या साहाय्याने मात कराल. बेकायदेशीर व्यवहार मात्र टाळा. खोट्या सह्या करणारे अडचणीत येतील.

Trending