Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Today 22 Aprils horoscope

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा असेल सोमवार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 22, 2019, 12:02 AM IST

आज दिवसभर एक शुभ आणि एक अशुभ योग राहील

 • Today 22 Aprils horoscope
  सोमवार 22 एप्रिलला दिवसभर एक शुभ आणि एक अशुभ योग राहील. आत राहू काळ दुपारी ३.०० ते ४.३० दरम्यान असेल. आज दिशा शूल उत्तरेस असेल. आजचा दिवस सामान्य जाईल.

 • Today 22 Aprils horoscope

  मेष: शुभ रंग : क्रिम | अंक : ८
  नोकरी व्यवसायात चढाओढ वाढली आहे.गुंतवणूक करताना  झटपट लाभाचा मोह टाळा. एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. वाद टाळा.

 • Today 22 Aprils horoscope

  वृषभ: शुभ रंग : मरुन | अंक : ६
  अचानक हाती आलेला पैसा तुमची उमेद वाढवेल. व्यवसायात उद्दीष्टे सहज पूर्ण झाल्याने मनावरील काळजीचे सावट दूर होईल. इच्छापूर्ती होईल.   
   

 • Today 22 Aprils horoscope

  मिथुन : शुभ रंग : निळा | अंक : ७
  नोकरदारांना वरीष्ठांच्या खोचक प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील. अधिकारांचा गैरवापर टाळा. कर्तव्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. दैवाची साथ लाभेल.     

 • Today 22 Aprils horoscope

  कर्क :  शुभ रंग : सोनेरी | अंक : ४
  कार्यक्षेत्रात कितीही अडचणी आल्या तरी दैव आज तुमच्याच बजूने आहे. प्रामाणिक प्रयत्न कारणी लागतील. सज्जनांच्या सहवासाने मन प्रसन्न राहील. 
   

 • Today 22 Aprils horoscope

  सिंह : शुभ रंग : केशरी | अंक : ३ 
  कोणतेही धाडस टाळा. आपल्या सुरक्षेस प्राधान्य देणे गरजेचे आहे. तरूणांनी मर्यादा सांभाळाव्या. नीतीबाह्य वर्तनाने प्रतिष्ठा धोक्यात येईल.                                                                              
   

 • Today 22 Aprils horoscope

  कन्या : शुभ रंग : पिवळा | अंक : ५
  आज सहकाऱ्यांशी मिळून मिसळूनच कामे होतील. अहंकाराची बाधा नको. प्रसंगी विरोधकांनाही चहा पाजणे गरजेचे राहील. जोडीदाराचे मन दुखाऊ नका. 

 • Today 22 Aprils horoscope

  तूळ : शुभ रंग : भगवा | अंक : ८
  कार्यक्षेत्रात काही हितशत्रूंच्या कारवायांना तोंड द्यावे लागेल. नवीन ओळखीत विश्वास ठेवणे हिताचे नाही.देण्याघेण्याचे व्यवहार चोख ठेवा. भिडस्तपणा नको. 

 • Today 22 Aprils horoscope

  वृश्चिक : शुभ रंग : लाल | अंक : ९           
  पैशाची कमतरता नसल्याने चैनी व विलासी वृत्ती जोपासता येईल. काही रसिक मंडळी सहकुटुंब सहलीचे बेत आखतील. आज प्रेमप्रकरणे फुलतील, बहरतील.    

 • Today 22 Aprils horoscope

  धनू :  शुभ रंग : गुलाबी | अंक : २
  आज काही घरेलू प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्याल. काही दूरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील. हितसंबंधात सुधारणा होईल. विद्यार्थी अभ्यास मनावर घेतील.                                                                             
   

 • Today 22 Aprils horoscope

  मकर : शुभ रंग : आकाशी | अंक : १
  आवक मनाजोगती असली तरी पैशाची उधळपट्टी टाळणे गरजेचे आहे. उद्योगव्यवसायात जाहीरातींवर खर्च करावा लागेल. शेजारी आपलेपणा दाखवतील.

 • Today 22 Aprils horoscope

  कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : २
  आज घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कतृत्वाचाही प्रभाव पडेल. गरजुंच्या मदतीस धावून जाल. आज भावंडात मात्र काही क्षुल्लक मतभेद संभवतात.
   

 • Today 22 Aprils horoscope

  मीन : शुभ रंग : चंदेरी | अंक : १ 
  उच्च राहणीमानाकडे तुमचा कल राहील. प्रतिष्ठीतांच्या सहवासात तुमच्या महत्वाकांक्षांना खतपाणी मिळेल. आज विवाहविषयक बोलणी सामंजस्याने पार पडतील.

Trending