आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज चतुर्थी आणि गुरुवारचा योग, प्रथम पूज्य श्रीगणेशासोबतच करावी भगवान विष्णूंची पूजा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार, 12 मार्चला फाल्गुन मासातील कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी आहे. गुरुवारी ही तिथी आल्यामुळे या दिवशी श्रीगणेशासोबतच भगवान विष्णू आणि गुरु ग्रहाची विशेष पूजा करावी. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी पं. सुनील नागर यांच्यानुसार श्रीगणेश पूजेमध्ये संपूर्ण शिव कुटुंब असावे. शिव कुटुंबात महादेव, देव पार्वती, श्रीगणेश, कार्तिकेय स्वामी, नंदी आणि श्रीगणेशाच्या पत्नी रिद्धी-सिद्धी आहेत. या सर्व देवी-देवतांचे एकत्र पूजन करावे. 

पूजेमध्ये दिवा लावून खालील मंत्राचा उच्चार करावा 

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। 

निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

अशाप्रकारे करावे चतुर्थी व्रत
- सकाळी लवकर उठून अंघोळ करुन घ्या. तुमच्या इच्छेनुसार सोने, चांदी, तांबे, पीतळ किंवा मातीच्या मूर्तीची स्थापना करा.
- त्यानंतर श्रीगणेशाची पूजा करावी. श्रीगणेशाला लाल फुल, गुलाल अर्पण करावा. गणेश मंत्र (ऊं गं गणपतयै नम:) चा उच्चार करत 21 दुर्वा अर्पण करा.
- श्रीगणेशाला 21 लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये 5 मोदक मूर्तीजवळ ठेवावेत आणि पाच ब्राह्मणांना दान करावेत. इतर मोदक प्रसाद स्वरूपात इतरांना वाटून टाकावेत.
- पूजेमध्ये गणपती स्त्रोत, अथर्वशीर्ष, संकटनाशक स्त्रोत आदिचा पाठ करा.
- ब्राह्मणांना जेवू घालून दक्षिणा द्यावी. संध्याकाळी स्वतः जेवण करावे. शक्य असल्यास उपवास करावा.

बातम्या आणखी आहेत...