Horoscope / आजचे राशिभविष्यः तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा सोमवार

जाणून घ्या, राशीनुसार असा राहील आजचा सोमवार

रिलिजन डेस्क

Sep 09,2019 12:00:00 AM IST

सोमवार, 9 सप्टेंबर रोजी दिवसाची सुरुवात अमृत मुहूर्तामध्ये होत आहे. राहू काळ सकाळी 7.30 ते 9 वाजेपर्यंत राहील. पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्रांमुळे एक शुभ योग जुडून येत आहे. काहींना आज कामाच्या ठिकाणी मानसिक ताण वाढू शकतो. अशात कुटुंबियांचा सल्ला मदत करू शकतो. कुठलेही काम करण्यापूर्वी जोडीदाराला किंवा सहकाऱ्याला विश्वासात घ्या. एकूणच 12 पैकी 5 राशींसाठी आजचा दिवस चांगला राहील. तर उर्वरीत राशींसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरू शकतो.

राशिनुसार, आजचा दिवस जाणून घ्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा

मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ५ कार्यक्षेत्रात दुपारपर्यंत विरोधी वातावरण असून काही किचकट पेचप्रसंगांना तोंड द्यावे लागेल. संध्याकाळी आज ज्येष्ठांचे पाय आपोआप सत्संगाकडे वळतील.वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : १ आज तुम्हाला न मागता सल्ले देणारे काही विद्वान भेटतील. मानसिक संतूलन ढळू देऊ नका. आज जनाचे ऐकून मनाचेच करा. मात्र आपल्या मर्यादेत रहा.मिथुन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३ आज सर्व महत्वाची कामे दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी. दिवसाच्या उत्तरार्धात काही मनाविरूध्द घटनांनी बेचैन व्हाल. ज्येष्ठांना उपासना मानसिक बळ देईल.कर्क : शुभ रंग : आकाशी | अंक : ८ उद्योगधंद्यातील महत्वपूर्ण करार मदार यशस्वी होतील. आज संध्याकाळचा वेळ फक्त कुटुंबियासाठी राखीव ठेवाणे हिताचे. वैवाहीक जिवनांत आज तू तीथे मी.सिंह : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ९ कार्यक्षेत्रात प्रगतीपथावर राहून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करता येईल. आवडत्या व्यक्तीच्या सहवासात आजचा संध्याकाळचा वेळ मजेत जाईल.कन्या : शुभ रंग : सोनेरी| अंक : ७ आज तुम्ही आपले आवडते छंद व व्यासंग जपण्यासाठी आवर्जुन वेळ कढाल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटीत जुन्या स्मृतींना उजाळा द्याल. गृहाेद्योग तेजीत चालतील.तूळ : शुभ रंग : क्रिम | अंक : ५ थोडयाफार काैटुंबिक कटकटींवर जोडीदाराच्या सहाय्याने मात कराल. बेकायदेशीर व्यवहार मात्र टाळा. खोट्या सह्या करणारे अडचणीत येतील.वृश्चिक : शुभ रंग : चंदेरी | अंक : ६ उद्योगधंद्यात मेहनत व चिकाटीच कामी येईल. मोठी स्वप्ने बघताना वास्तवाचे भान असणेही गरजेचे आहे. दुपारनंतर एखाद्या अनुकूल घटनेने उत्साह वाढेल.धनू : शुभ रंग : पांढरा | अंक : ४ आज खिशात पैसा खुळखुळेल. तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. एखाद्या समारंभात आत्मविश्वासाने वावराल. स्वत:चा मोठेपणा जपाल.मकर : शुभ रंग : मोतिया | अंक : २ आज हातचे सोडून मृगजळामागे धावायचा मोह होईल. काही चुकीचे सल्ले देणारी माणसे भेटतील. कोणताही निर्णय घेताना जोडीदाराचा सल्ला घ्या.कुंभ : शुभ रंग : निळा| अंक : १ कितीही पैसा आला तरी तो जाण्याचे मार्गही आधीच तयार असतील. जमाखर्चाचा तराजू समतोलच राहील.देण्याघेण्याचे व्यवहार चोख ठेवा. कुसंगती टाळाच.मीन : शुभ रंग : जांभळा | अंक : ३ नोकरीत कामाशी प्रामाणिक असाल. आज आपले काम सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी गौण असतील. वरीष्ठही तुमच्या अडचणी समजून घेतील.

मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ५ कार्यक्षेत्रात दुपारपर्यंत विरोधी वातावरण असून काही किचकट पेचप्रसंगांना तोंड द्यावे लागेल. संध्याकाळी आज ज्येष्ठांचे पाय आपोआप सत्संगाकडे वळतील.

वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : १ आज तुम्हाला न मागता सल्ले देणारे काही विद्वान भेटतील. मानसिक संतूलन ढळू देऊ नका. आज जनाचे ऐकून मनाचेच करा. मात्र आपल्या मर्यादेत रहा.

मिथुन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३ आज सर्व महत्वाची कामे दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी. दिवसाच्या उत्तरार्धात काही मनाविरूध्द घटनांनी बेचैन व्हाल. ज्येष्ठांना उपासना मानसिक बळ देईल.

कर्क : शुभ रंग : आकाशी | अंक : ८ उद्योगधंद्यातील महत्वपूर्ण करार मदार यशस्वी होतील. आज संध्याकाळचा वेळ फक्त कुटुंबियासाठी राखीव ठेवाणे हिताचे. वैवाहीक जिवनांत आज तू तीथे मी.

सिंह : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ९ कार्यक्षेत्रात प्रगतीपथावर राहून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करता येईल. आवडत्या व्यक्तीच्या सहवासात आजचा संध्याकाळचा वेळ मजेत जाईल.

कन्या : शुभ रंग : सोनेरी| अंक : ७ आज तुम्ही आपले आवडते छंद व व्यासंग जपण्यासाठी आवर्जुन वेळ कढाल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटीत जुन्या स्मृतींना उजाळा द्याल. गृहाेद्योग तेजीत चालतील.

तूळ : शुभ रंग : क्रिम | अंक : ५ थोडयाफार काैटुंबिक कटकटींवर जोडीदाराच्या सहाय्याने मात कराल. बेकायदेशीर व्यवहार मात्र टाळा. खोट्या सह्या करणारे अडचणीत येतील.

वृश्चिक : शुभ रंग : चंदेरी | अंक : ६ उद्योगधंद्यात मेहनत व चिकाटीच कामी येईल. मोठी स्वप्ने बघताना वास्तवाचे भान असणेही गरजेचे आहे. दुपारनंतर एखाद्या अनुकूल घटनेने उत्साह वाढेल.

धनू : शुभ रंग : पांढरा | अंक : ४ आज खिशात पैसा खुळखुळेल. तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. एखाद्या समारंभात आत्मविश्वासाने वावराल. स्वत:चा मोठेपणा जपाल.

मकर : शुभ रंग : मोतिया | अंक : २ आज हातचे सोडून मृगजळामागे धावायचा मोह होईल. काही चुकीचे सल्ले देणारी माणसे भेटतील. कोणताही निर्णय घेताना जोडीदाराचा सल्ला घ्या.

कुंभ : शुभ रंग : निळा| अंक : १ कितीही पैसा आला तरी तो जाण्याचे मार्गही आधीच तयार असतील. जमाखर्चाचा तराजू समतोलच राहील.देण्याघेण्याचे व्यवहार चोख ठेवा. कुसंगती टाळाच.

मीन : शुभ रंग : जांभळा | अंक : ३ नोकरीत कामाशी प्रामाणिक असाल. आज आपले काम सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी गौण असतील. वरीष्ठही तुमच्या अडचणी समजून घेतील.
X
COMMENT