आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा शुक्रवार

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 10 जानेवारी रोजी दिवसाची सुरुवात आर्द्रा नक्षत्रामध्ये होत आहे. शाकंभरी देवी पौर्णिमा, माघस्नानारंभ असे आजचे दिनविशेष आहेत. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावाने आजचा दिवस 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. तर उर्वरीत चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.

  • मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : ७ सर्वच दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावा.जिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार आहे.कर्जप्रस्ताव मंजूर होऊ शकतील. शत्रू माघार घेतील.
  • वृषभ: शुभ रंग : मोरपंखी | अंक : ६ नोकरीत अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल. तुमच्या कार्यनिष्ठेची दखल घेतली जाईल. आज तुम्ही जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
  • मिथुन : शुभ रंग : तांबडा | अंक : ९ घरात वडीलधारी मंडळी त्यांची मते तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतील. कामधंद्यातील अडचणी मानसिक स्वास्थ्य बिघडवतील. एकांत हवासा वाटेल.
  • कर्क : शुभ रंग : मोतिया | अंक : ३ विश्वासातील माणसाकडूनही विश्वासघात होण्याची शक्यता आहे. मोठया उलाढाली टाळलेल्या बऱ्या. स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करू नका.
  • सिंह : शुभ रंग : राखाडी| अंक : ७ व्यवसायात भागिदारांशी सलोख्याचे संबंध राहतील.वैवाहीक जिवनांत खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. आशादायी दिवस.
  • कन्या : शुभ रंग : जांभळा| अंक : ८ कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. तरूणांनी व्सनसंपासून दूर रहाणे गरजेचे आहे. कुसंगत टाळावी. नोकरदारांनी कामाशी प्रामाणिक रहाणे गरजेचे आहे.
  • तूळ : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६ कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहीणी आवडत्या छंदास वेळ देतील. नवोदीत कलाकारांना ग्लॅमरची चव चाखता येईल. विद्यार्थ्यांना सुयश.
  • वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १ आज दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. आवक पुरेशी राहील. जागाविषयक प्रश्न सुटतील. आज प्रेमप्रकरणांत मात्र नसती आफत होईल, सांभाळा.
  • धनू : शुभ रंग : भगवा | अंक : २ आजचा दिवस धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. काहींंना प्रवासाचे याेग अटळ आहेत. नव्या ओळखी होतील.
  • मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ४ पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे.घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. वैवाहीक संबंधात गोडवा राहील. गृहलक्ष्मी व मुले हसतमुख असतील.
  • कुंभ : शुभ रंग : मरून| अंक : ३ स्वभावातील अहंकारामुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. आज डोके थंड व वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक क्लीष्ट कामेही सोपी होतील.
  • मीन : शुभ रंग : निळा | अंक : ५ कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. काही महत्वाच्या कामानिमित्त बरीच पायपीट होण्याची शक्यता आहे. काही बिले भरावी लागतील.
बातम्या आणखी आहेत...