Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Today is election campaigns last day

Election2019:मराठवाड्याच्या सहा मतदारसंघांतील प्रचार तोफा आज थंडावणार; १८ एप्रिलला मतदान

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 16, 2019, 10:04 AM IST

११९ उमेदवारांची अग्निपरीक्षा, १५ ते २० दिवस उडवला प्रचाराचा धुरळा

  • Today is election campaigns last day

    औरंगाबाद- मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर आणि उस्मानाबाद या सहा लोकसभा मतदारसंघांत दुसऱ्या टप्प्यातील मतदान १८ एप्रिल रोजी होणार आहे. आदर्श आचारसंहितेनुसार या सहा मतदारसंघांतील प्रचारतोफा मंगळवारी सायंकाळी थंडावतील. या सहा लोकसभा मतदारसंघांतील ११९ उमेदवारांनी गेली १५ ते २० दिवसांपासून प्रचाराचा धुराळा उडवला होता.


    हिंगोलीत २८ उमेदवार : हिंगोली लोकसभा मतदारसंघात या वेळी एकूण २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यातील ११ उमेदवार पक्ष आणि संघटनांच्या छत्राखाली निवडणूक लढत असून उर्वरित १७ उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत. बसपचे दत्ता मारोती धनवे, काँग्रेसचे सुभाषराव बापूराव वानखेडे, शिवसेनेचे हेमंत पाटील, वंचित बहुजन आघाडीचे मोहन फत्तुसिंग राठोड आदी हिंगोली लोकसभेतील प्रमुख उमेदवार गणले जात आहेत.


    उस्मानाबादेत प्रतिष्ठेची लढाई : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात या वेळी काट्याची लढत आहे. या मतदारसंघातून १४ उमेदवार रिंगणात उतरले असून महाआघाडीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि युतीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यात काट्याची टक्कर आहे. बसपचे डॉ. शिवाजी ओमन, वंचित बहुजन आघाडीचे अर्जुनदादा सलगर स्पर्धेत आहेत.


    लातुरात धनशक्तीत लढाई : लातूर लोकसभा मतदारसंघात सध्या धनशक्तीतच लढाई सुरू आहे. महाआघाडीकडून मच्छिंद्र कामंत हे उद्योजक तर युतीकडून सुधाकर शृंगारे हे बिल्डर या दोघांत घमासान सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे रामराव गारकर, बसपचे डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी आदींसह १० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दहापैकी सात उमेदवार पक्ष व संघटनांकडून लढत आहेत तर तिघे अपक्ष उमदेवार आहेत.

Trending