Home | National | Delhi | today is hearing in supreme court on Karnataka political issue

कर्नाटकचे नाटक आज सुप्रीम कोर्टात रंगणार? बंडखोर आमदार ठाम, पुन्हा आघाडीला पाठिंबा देण्यास १६ जणांचा नकार

वृत्तसंस्था, | Update - Jul 22, 2019, 08:36 AM IST

सायंकाळी ५ पूर्वी मतदान घ्यावे : दोन अपक्ष आमदारांची सुप्रीम कोर्टात धाव

 • today is hearing in supreme court on Karnataka political issue

  नवी दिल्ली - कर्नाटकातील राजकीय नाट्य सोमवारी पुन्हा सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दाखल केलेल्या विश्वासदर्शक ठरावावर सोमवारी सायंकाळी ५ पर्यंत मतदान घ्यावे, या मागणीसाठी दोन अपक्ष आमदार सुप्रीम कोर्टात गेले आहेत. तर, सभागृहाच्या कारवाईत राज्यपालांनी दखल देऊ नये म्हणून मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी एक याचिका दाखल करून ठेवली आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही बंडखोर आमदारांना सभागृहात अनुपस्थित राहण्याची परवानगी देणाऱ्या १७ जुलैच्या आदेशास आव्हान दिले आहे. ही तिन्ही प्रकरणे सोमवारी सुप्रीम कोर्टासमोर येऊ शकतात. या सुनावणीत सुप्रीम कोर्ट दिलासा देईल, या आशेने राज्य सरकार विश्वासदर्शक ठरावावरील चर्चा लांबवू शकते. या प्रस्तावावर गुरुवार-शुक्रवार असे दोन दिवस चर्चा होऊनही मतदान होऊ शकले नव्हते.


  दरम्यान, विधानसभेतील ही स्थिती पाहता राज्यपाल वजुभाई वाला काय कारवाई करतात, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारमधील १६ आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर १४ महिन्यांपूर्वी स्थापन झालेले कुमारस्वामी सरकार अडचणीत आले आहे. सुप्रीम कोर्टात दाद मागणारे आर. शंकर आणि एच. नागेश हे दोन अपक्ष आमदार सरकारचा पाठिंबा काढून घेत भाजपच्या तंबूत दाखल झाले आहेत.


  जेडीएसचे बंडखोर आमदार विश्वनाथ यांनी सरकारला अपवित्र, राक्षस संबाेधले : जेडीएसचे बंडखाेर अामदार एच. विश्वनाथ यांनी कर्नाटक सरकार अपवित्र व राक्षसी वृत्तीचे असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, आम्ही या अपवित्र सरकारला चांगला धडा शिकवू इच्छिताे. आम्हाला हे राक्षसी सरकार नकाे आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे आमदार बी. बस्वराज यांनीही एका व्हिडिओ मेसेजमध्ये सरकारला लक्ष्य करत सांगितले की, हे सरकार आमदारांचे भविष्य खराब करत आहे. यादरम्यान विधानसभेतील बसपचे एकमेव आमदार एन. महेश यांनी विश्वासदर्शक प्रस्तावावरील मतदानात तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केली.

  > बंडखोर आमदार ठाम, पुन्हा आघाडीला पाठिंबा देण्यास १६ जणांचा नकार.
  > तोडगा म्हणून कुमारस्वामी मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार असल्याचे वृत्त.
  > कुमारस्वामींचे पिता एच. डी. देवेगौडांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली.

Trending