Home | Maharashtra | Vidarva | Akola | Today is last chanse of Hardship and compounding scheme

गुंठेवारीचे प्लॉट नियमानुकूल करण्याची आज अखेरची संधी

प्रतिनिधी | Update - Aug 31, 2018, 12:25 PM IST

हार्डशिप अॅन्ड कंपाऊडिंग योजनेच्या माध्यमातून केवळ काही प्रमाणात अवैध बांधकामच नियमित होणार नसून गुंठेवारी पद्धतीचे

  • Today is last chanse of Hardship and compounding scheme

    अकोला- हार्डशिप अॅन्ड कंपाऊडिंग योजनेच्या माध्यमातून केवळ काही प्रमाणात अवैध बांधकामच नियमित होणार नसून गुंठेवारी पद्धतीचे प्लॉट, नियमानुकूल करता येणार आहेत. या दोन्ही प्रकारांचे प्रस्ताव दाखल करण्याची ३१ ऑगस्ट अखेरची संधी आहे. दरम्यान आता पर्यंत अवैध बांधकाम व गुंठेवारी नियमानुकूल मध्ये १७० प्रस्ताव दाखल झाले आहेत.


    महापालिका क्षेत्रात २०१४ पर्यंत गुंठेवारीचे नियमानुकूल सुरू होते. मात्र, २०१४ पासून कोणतीही लेखी सूचना न देता, गुंठेवारी नियमानुकूल बंद करण्यात आले. महापालिकेची हद्दवाढ होण्यापूर्वी शहराचा काही भाग गुंठेवारी पद्धतीचा होता. मात्र, हद्दवाढ झाल्यानंतर महापालिका क्षेत्राचा ५० ते ५५ टक्के भाग हा गुंठेवारी पद्धतीचा झाला आहे. गुंठेवारी प्लॉटधारकाला नियमानुकूल केल्याशिवाय बांधकामाचा नकाशा मंजूर करता येत नाही तसेच बँकेतून कर्जही मिळत नाही. त्यामुळे महापालिकेकडे नकाशा मंजूर न करता विकास शुल्काचा भरणा न करता थेट घराचे बांधकाम केले जाते. हे सर्व बांधकाम नकाशा मंजूर नसल्याने अवैध ठरते. एकीकडे गुंठेवारी तर दुसरीकडे मंजूर नकाशापेक्षा अधिक बांधकामाची प्रकरणे केवळ अकोला महापालिकाच नव्हे तर राज्यभरात त्रासाचा विषय बनली होती. यावर राज्य शासनाने स्वत: धोरण निश्चित केले. या धोरणानुसार समास अंतरात ५० टक्के सूट देण्यात आली असून, अंतर न सोडल्याबाबत हार्डशिप अॅन्ड कंपाउंडींग शुल्क राज्य शासनाने निश्चित केले आहे. याचबरोबर गुंठेवारी पद्धतीचे प्लॉटवरील बांधकाम एक प्रकारे अवैध असल्याने गुंठेवारी पद्धतीच्या प्लॉटवरील बांधकामाला वैध करण्याची संधी मिळाली आहे. ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत अथवा त्यापूर्वी खरेदी झालेले प्लॉट तसेच बांधकाम झालेली घरे यांना ही संधी मिळाली आहे. राज्य शासनाच्या जीआरनुसार ३१ मेपर्यंत अवैध बांधकाम वैध करता येणार होते. मात्र ही योजना सुरु ठेवण्याचे अधिकार आता महापालिकेला देण्यात आले आहे. महापालिकेने या योजनेला मुदतवाढ दिली असून ३१ ऑगस्ट ही योजना सुरु राहणार आहे.


    आज अखेरचा दिवस
    अवैध बांधकामामुळे अनेक फ्लॅट सिस्टिम तसेच बांधकामे अडचणीत आले आहेत. तर गुंठेवारीचा प्लॉट नियमानुकूल न झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता पर्यंत १७० प्रस्ताव दाखल झाले असून दोन्ही प्रकारचे प्रस्ताव दाखल करण्याची ३१ ऑगस्ट शेवटची संधी आहे.

Trending