Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | Today Nashik Police Award ceremony by Divya Marathi

'दिव्य मराठी'तर्फे आज नाशिक पोलिस पुरस्कार सोहळ्यात होणार सन्मान

प्रतिनिधी | Update - Dec 20, 2018, 08:32 AM IST

पालकमंत्री महाजन, गृहराज्यमंत्री पाटील व एसीबीचे बर्वे राहणार उपस्थित

 • Today Nashik Police Award ceremony by Divya Marathi

  नाशिक - शिस्तबद्ध आणि कर्तव्यदक्ष अशी ओळख निर्माण केलेल्या नाशिक शहर व जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दैनिक 'दिव्य मराठी'तर्फे आयोजित आणि फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमी प्रस्तुत 'नाशिक पोलिस पुरस्कार २०१८' सन्मान सोहळा गुरुवारी (दि. २०) सायंकाळी ६.३० वाजता हाॅटेल एक्स्प्रेस इनमध्ये हाेणार आहे. या कार्यक्रमात शहर व ग्रामीण पाेलिस दलातील वेगवेगळ्या १६ गटांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एकूण ३२ पाेलिसांचा व महाराष्ट्र पाेलिस प्रबाेधनीतील उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ठरलेल्या वेगवेगळ्या सहा गटांतील अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार अाहे. हा कार्यक्रम विशेष निमंत्रितांसाठी आहे.

  या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री डाॅ. रणजित पाटील व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पाेलिस महासंचालक संजय बर्वे हे मान्यवर उपस्थित राहणार अाहेत. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थींना गाैरविण्यात येणार आहे.

  नाशिक पोलिस आयुक्तालयात कार्यरत कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी, तसेच ग्रामीण पोलिस दल आणि महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीतील प्रशिक्षणार्थींमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी केला जाणार अाहे. यामध्ये विविध १६ कॅटेगरीजमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यांची निवड करण्यासाठी नेमलेल्या समितीत परीक्षक म्हणून पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस अधीक्षक संजय दराडे, महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोरजे आणि 'दिव्य मराठी'चे निवासी संपादक जयप्रकाश पवार यांनी काम पाहिले आहे. या सोहळ्यासाठी डेन सहप्रायोजक असून कारडा कन्स्ट्रक्शन्स, चौधरी यात्रा कंपनी यांचेही सहकार्य लाभले आहे. अनमोल नयनतारा व जितेंद्र इलेक्ट्रिक व्हेइकल हे सपोर्ट पार्टनर आहेत. तसेच, गिरी मीडिया क्रिएटिव्ह पार्टनर आहेत.

  कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव
  या सन्मान साेहळ्यानिमित्त 'दिव्य मराठी'तर्फे https://www.facebook.com/Marathi.Divya/ हे विशेष फेसबुक पेज तयार केले आहे. या पेजवर वाचकांना पोलिसांविषयी कृतज्ञता किंवा थँक्यू स्टोरी पोस्ट करता येईल. तसेच, व्हॉट‌्सअॅप क्रमांक ८१४९००२५८० यावरही पोस्ट करून 'नाशिक पोलिस पुरस्कार २०१८' या सन्मान सोहळ्यात सहभागी होता येईल.

  या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा होणार गौरव
  पोलिस पुरस्कारांसाठी बेस्ट ट्रेनर, बेस्ट डिटेक्शन, इनोव्हेटिव्ह ट्राफिक ऑफिसर, माेस्ट इफेक्टिव्ह पोलिस पर्सन, बेस्ट पब्लिक प्रॉसिक्युटर, इफेक्टिव्ह पोलिस स्टेशन, इफेक्टिव्ह स्पोर्ट‌्स पर्सन, अाेल्डेस्ट सर्व्हिस पाेलिस पर्सन, अाेल्डेस्ट केस साॅल्व्ह, चॅलेजिंग केस साॅल्व्ह बाय टीम, माेस्ट साॅल्व्ह केस इन ए वन इअर, बेस्ट कंट्राेल रूम अाॅफिसर, इफेक्टिव्ह इन्व्हेस्टिगेशन इन सायबर क्राइम, आणि सर्वोत्कृष्ट महिला पोलिस, बेस्ट पैरवी अधिकारी यांसारख्या १६ कॅटेगरीजमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. याशिवाय महाराष्ट्र पाेलिस प्रबाेधिनीसाठी बेस्ट ट्रेनर (इनडाेअर-अाउटडाेअर), बेस्ट कॅडेट (इन अॅण्ड अाउटडाेअर) अशा सहा पुरस्कारांसह अायर्न मॅन स्पर्धा जिंकलेल्या नाशिकमधील चाैघांचा यावेळी सन्मान केला जाणार अाहे.

  थेट प्रक्षेपण :
  पाेलिस सन्मान साेहळ्याचे डेन केबल नेटवर्कच्या चॅनल क्रमांक ८२२ वर थेट प्रक्षेपण पाहता येईल.

Trending