Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | aajache rashibhavishya 11 april 2019 horoscope in marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

रिलिजन डेस्क | Update - Apr 11, 2019, 12:00 AM IST

Today Rashifal : आज शुभ योगामध्ये होईल दिवसाची सुरुवात, दुपारी 3.32 पासून सुरु होईल अशुभ योग, चंद्र आला मिथुन राशीमध्ये,

 • aajache rashibhavishya 11 april 2019 horoscope in marathi

  गुरुवार, 11 एप्रिलला दिवसाची सुरुवात शोभन नावाचा शुभ योगामध्ये होईल. मृगशिरा नक्षत्रामध्ये सूर्योदय होईल. दुपारी 3.32 पर्यंत हा शुभ योग राहील. त्यानंतर अतिगंड नावाचा शुभ योग सुरु होईल, जो रात्रीपर्यंत राहील. चंद्र बुधची राशी मिथुनमध्ये आला आहे. एक शुभ आणि एक अशुभ योगामुळे 12 पैकी सहा राशीच्या लोकांसाठी दिवस फायदा करून देणारा राहील तर इतर राशींसाठी संमिश्र फळ देणारा राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

 • aajache rashibhavishya 11 april 2019 horoscope in marathi

  मेष : काही कारणाने कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल. वाढीव जबाबदाऱ्या पूर्ण करताना  थकवा जाणवेल. नोकरीत वरीष्ठांशी नमते घ्यावेेे. घराबाहेर वाद होतील.  शुभरंग: निळा | अंक:६

 • aajache rashibhavishya 11 april 2019 horoscope in marathi

  वृषभ: आज हातात पैसा राहील. आवडत्या क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळेल. चैनी व विलासी वृत्तीस खतपाणी घालाल. शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवा. शुभ रंग: पिवळा |अंक:८ 

 • aajache rashibhavishya 11 april 2019 horoscope in marathi

  मिथुन : आज रिकामटेकड्या चर्चेतून वाद होण्याची शक्यता आहे. समोरच्या व्यक्तीस मूर्ख समजण्याची चूक करू नका. वैवाहीक जिवनांत जोडीदाराच्या मताने घ्या. शुभ रंग : पिस्ता| अंक : ९

 • aajache rashibhavishya 11 april 2019 horoscope in marathi

  कर्क : अनपेक्षित मोठे खर्च उद्भवल्याने आर्थिक ओढाताण संभवते. वडीलधाऱ्यांशी मतभेद होतील पण त्यांच्या वयाचा मान राखाल. कलाकारांचा विदेशी नावलौकिक.  शुभ रंग : हिरवा| अंक : ७

 • aajache rashibhavishya 11 april 2019 horoscope in marathi

  सिंह : आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भाराऊन जाल. मस्त दिवस. शुभ रंग : क्रिम | अंक : ५ 

 • aajache rashibhavishya 11 april 2019 horoscope in marathi

  कन्या : आज वेळेअभावी कौटुंबिक गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. वडीलधाऱ्यांच्या शब्दास मान द्यावा लागेल. व्यवसायात भिडस्तपणास लगाम घाला. शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ३

 • aajache rashibhavishya 11 april 2019 horoscope in marathi

  तूळ : कार्यक्षेत्रात स्पर्धा अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. आज चर्चेपेक्षा झटपट निर्णय घेणे हिताचे राहील.जे आपल्याला कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका. शुभ रंग : राखाडी | अंक : १

 • aajache rashibhavishya 11 april 2019 horoscope in marathi

  वृश्चिक : आज तुम्ही आपल्या मर्यादा ओळखून वागणेच हिताचे राहील. कुणी पाठीवर हात ठेऊन लढ म्हणाले तर त्याला म्हणावे तुच जा. आज स्वत:च्या सुरक्षिततेस प्राधान्य द्या. शुभ रंग : चंदेरी | अंक : ४

 • aajache rashibhavishya 11 april 2019 horoscope in marathi

  धनू : अथक प्रयत्नांच्या जोरावर आज तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरु राहील. महत्वाच्या वाटाघाटी, विवाह विषयी चर्चेसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. शुभ रंग : मरून | अंक : २

 • aajache rashibhavishya 11 april 2019 horoscope in marathi

  मकर : आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. विवाह जुळवण्याविषयी बोलणी उद्यावर ढकला. आज कोणतेही निर्णय उताविळपणे घेणे योग्य ठरणार नाही. शुभ रंग : आकाशी | अंक : ३

 • aajache rashibhavishya 11 april 2019 horoscope in marathi

  कुंभ : आज बरेच दिवसानी तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येण्याची शक्यता आहे. कवींना प्रेमगीते सुचतील. गृहीणी पार्लरसाठी वेळ काढतील. शुभ रंग : जांभळा  | अंक : ६

 • aajache rashibhavishya 11 april 2019 horoscope in marathi

  मीन : एखादा नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. अधिकारांचा गैरवापर टाळून कर्तव्यास प्राधान्य द्या. आज मुलांच्या शिस्तीकडे लक्ष पुरवावेे लागेल. शुभ रंग : पांढरा  | अंक : ९

Trending