आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाज भारताचा तिसरा सामना बांगलादेशसाेबत; ३ खेळाडू जायबंदी झाल्याने स्पर्धेतून बाहेर!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- सलगच्या दाेन विजयांनी जबरदस्त फाॅर्मात असलेला गत चॅम्पियन भारतीय संघ अाता अाशिया चषकातील सुपर-४ चा सामना जिंकण्यासाठी सज्ज झाला अाहे. टीम इंडिया स्पर्धेत विजयाची हॅट््ट्रिक नाेंदवण्याच्या इराद्याने मैदानावर उतरणार अाहे. भारत अाणि बांगलादेश संघ शुक्रवारी समाेरासमाेर असतील. दुसरीकडे अबुधाबीच्या मैदानावर अफगाणिस्तान अाणि पाकिस्तान यांच्यात झुंज रंगणार अाहे. 


भारताने दाेन विजयांसह स्पर्धेतील अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. दरम्यान, भारताच्या खेळाडू गंभीर जखमी झाले. त्यामुळे दाेन सामन्यांत जायबंदी झाल्याने भारताच्या तीन खेळाडूंना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. पाकविरुद्ध सामन्यात हार्दिक, शार्दूल ठाकूर अाणि अक्षर पटेलला दुखापत झाली. त्यामुळे त्यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात अाला. 


जडेजा, दीपक, सिद्धार्थला संधी
किताबाचे हे लक्ष्य गाठण्यासाठी टीमची दमदार वाटचाल अाहे. मात्र, अाता तीन खेळाडू जायबंदी झाले. त्याच्या जागी संघात रवींद्र जडेजासह दीपक चाहर व सिद्धार्थ काैलला संधी देण्यात अाली. जडेजाने याच महिन्यात कसाेटीच्या संघात पुनरागमन केले. त्याने सात विकेटसह ९० धावांची खेळी केली. 


अफगाणचा दुसरा विजय; बांगलादेशचा पराभव 
अफगाणिस्तानने सलग दुसरा विजय नाेंदवला. अफगाणिस्तानने स्पर्धेतील अापल्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशवर १३६ धावांनी मात केली. अाता अफगाणला मंगळवारी भारताच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. अफगाणनने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशसमाेर २५६ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात बांगलादेशचा ४२.१ षटकांत अवघ्या ११९ धावांत गाशा गुंडाळला. 


अाज हाेणारे सामने 
भारत वि. बांगलादेश वेळ : सायं. ५.०० वाजेपासून ठिकाण : दुबई 
अफगाणिस्तान वि. पाकिस्तान वेळ : सायं. ५.०० वाजेपासून ठिकाण :अबुधाबी 

 

बातम्या आणखी आहेत...