आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रख्यात गीतकार, शायर, जावेद अख्तर यांच्याशी आज मुक्त संवाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- 'दिव्य मराठी'तर्फे मंगळवारी (४ डिसेंबर) प्रख्यात गीतकार, पटकथा लेखक आणि विचारवंत पद्मविभूषण जावेद अख्तर यांच्यासोबत 'जो डर गया समझो मर गया' या मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. जगदगुरू  संत तुकाराम नाट्यगृहात सायंकाळी ७ वाजता ही मैफल रंगणार आहे. 

 

शायर, गीतकार आणि पटकथा लेखक म्हणून ठसा उमटवणारे जावेद अख्तर सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही परिचित आहेत. आशयघन गीतांतून चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जावेद अख्तर विविध विषयांवर परखड मते व्यक्त करणारे म्हणूनही ओळखले जाते. त्यांची मते जाणून घेण्याची संधी या निमित्ताने औरंगाबादकर रसिकांना मिळणार आहे. मुक्तसंवादाचा हा कार्यक्रम २३ ते २५ नोव्हेंबर यादरम्यान झालेल्या दिव्य मराठीच्या लिटरेचर फेस्टिव्हलचाच एक भाग असून या कार्यक्रमाने लिटरेचर फेस्टिव्हलची सांगता होणार आहे. 

 

रूपांकन यांच्या सहयोगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी औरंगाबाद महानगरपालिका, विवंता ग्रुप, श्री सरस्वती भुवन महाविद्यालय, शेळके समूह, डॉ. विजय चाटोरीकर यांचे "भाग्य विजय', रेऑन इल्युमिनेशन, ९४.३ माय एफएम, ड्रीम्स क्रिएशन, स्टँडर्ड स्किल्स मिल्स, भोज आणि मोबीसॉफ्ट यांचे सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमाचे मोजकेच पासेस उपलब्ध होते. रविवारी सकाळी ११ ते ५ यादरम्यान 'दिव्य मराठी' कार्यालयातून ते वितरीत करण्यात आले. कार्यक्रमस्थळी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. रसिकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...