आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानात जागरूकता दाखवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्या विदर्भात सर्वाधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, तेथे आज मतदान होत आहे. ही लोकसभा निवडणूक देशाच्या, काँग्रेसच्या आणि भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. यंदाची निवडणूक काँग्रेस व भाजप यांच्या अस्तित्वाची असणार आहे. या वेळी भाजपला यश मिळाले नाही, तर देशात अस्थिरता राहील व काँग्रेसला जर यश मिळाले नाही, तर ती पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर जाऊन उभी राहील. म्हणूनच भारतीय मतदार कसा विचार करतो व कोणाला मत देतो, याला खूप महत्त्व आले आहे. मला कुणाची गरज नाही, अशा आत्ममग्नतेत काही लोक जगत असतात. इतरांवाचून आपले काही अडत नाही, असे यांना वाटते. म्हणूनच कुणीही निवडून आले, तरी मला काय फरक पडतो राव! अशी काही लोकांची बेफिकीर वृत्ती असते. काही मतदारांना मतदानाच्या रांगेत इतरांबरोबर उभे राहण्याची लाज वाटते, तर काहींना तेवढा वेळच नसतो. कोणीतरी येईल आणि मतदानासाठी मला घेऊन जाईल याची वाट पाहत घरातच बसून राहणारे आणि मतदानाची सुटी मतदान न करता ‘एंजॉय’ करणारे महाभागही कमी नाहीत.