Home | International | Other Country | Toddler decapitated in accident after scarf got tangled in bike wheels

धावत्या बाइकच्या टायरमध्ये स्कार्फ अडकून विचित्र अपघात, बाळाचे मुंडके झाले धडावेगळे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 02:59 PM IST

बाइकवर जाताना जीवघेणी ठरू शकते ओढणी किंवा साडीचा पदर...

 • Toddler decapitated in accident after scarf got tangled in bike wheels

  मनिला - दुचाकीवर मागे बसलेल्या महिलांच्या स्कार्फ, दुपट्टा किंवा साडीचा पदर जीवघेणा ठरू शकतो. याच निष्काळजीपणामुळे एका महिलेने आपला 19 महिन्यांचा बाळ गमावला. अपघात इतका भीषण होता की बाळाचे मुंडके धडावेगळे झाले. फिलिपाइन्सच्या समर परिसरात हा अपघात घडला. अपघाताचे चित्र पाहून प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढले. यासंदर्भातील फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.


  असा घडला अपघात...
  लॉरना (25) नावाची एक महिला आपल्या 19 वर्षांच्या मुलाला घेऊन बाइकवर मागे बसली होती. समर जिल्ह्यात एका डॉक्टरकडे या मुलाची अपॉइंटमेंट होती. दुचाकी तिची लॉरनाची आई चालवत होती. डॉक्टराकडे जाताना त्यांनी घाई-घाईत आपल्या स्कार्फकडे लक्ष दिलेच नाही. लॉरनाने घातलेला पिवळ्या रंगाचा स्कार्फ तसाच खाली लटकत होता. त्या स्कार्फच्या एका बाजूने आई लॉरना आपल्या बाळाचे उन्हापासून संरक्षण करत होती. उन्हापासून बचाव करण्यासाठी लावलेला स्कार्फचा दुसरा भाग खाली लटकत होता. तोच एका वाऱ्यासह धावत्या बाइकच्या मागच्या चाकात अडकला. बाळाच्या चेहऱ्यावर असलेला स्कार्फचा दुसरा भाग एक फास बनला आणि एका झटक्यात स्कार्फ टायरमध्ये गुंडाळून बाळ हातातून निसटून खाली पडले. स्कार्फचा फास इतका घट्टा होता की गाडी अवघ्या काही मिटरवर गेली आणि बाळाचे शिर धडापासून वेगळे झाले.


  हा संपूर्ण अपघात क्षणार्धात घडला. पीडित मुलाची आई आणि आजी काहीही करू शकले नाही. आईने मागे वळून पाहिले तेव्हा तिला आपल्या बाळाचा देह दोन तुकड्यांमध्ये सापडला. अवघ्या काही सेकंदापूर्वी जीवंत राहिलेल्या बाळाचा मृतदेह हातात घेऊन भर रस्त्यावर आईने हंबरडा फोडला. हे दृश्य पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयाचा ठोका वाढला. काय करावे कुणाला काहीच सूच नव्हते. यानंतर काही स्थानिक समोर आले आणि त्यांनी बाळाच्या आईला सावरण्याचा प्रयत्न केला. काही अंतरावरच तिच्या बाळाचा शिर स्कार्फमध्ये गुंडाळलेला पाहून आई पुन्हा किंचाळली.

 • Toddler decapitated in accident after scarf got tangled in bike wheels
 • Toddler decapitated in accident after scarf got tangled in bike wheels

Trending