Home | Khabrein Jara Hat Ke | Toddler who could die anytime he falls asleep desperate for new life-saving mask to help him breathe

बाळाला झोप लागताच उडते पालकांची झोप! रात्र-रात्रभर करावे लागते जागरण; इतका गंभीर आजार की मास्क हटवताच मृत्यूची भीती

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 12:03 AM IST

या गंभीर आजामुळे झोपेत कधीही त्याचा मृत्यू होऊ शकतो.

 • लंडन - घरात लहान बाळ असलेल्या प्रत्येक पालकाचे प्रयत्न असतात की त्याने जास्तीत-जास्त झोप घ्यावी. परंतु, इंग्लंडच्या डेनमेड शहरातील एका कपलचे बाळ झोपताच त्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात. त्यांच्या अवघ्या एका वर्षाच्या मुलाला गंभीर आजार आहे. या आजारात तो झोपेत जाताना त्याच्या शरीरातील नर्वस सिस्टिम काम करणे बंद होते. अशात झोपेतच त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळेच, या बाळाचे आई-वडील त्याला झोपी घालण्यासाठी घाबरतात. त्याला झोपण्यापूर्वी ऑक्सिजन मास्क घालणे आवश्यक आहे. त्यातही तो झोपेत असताना प्रत्येक क्षणाला त्याच्या शेजारी कुणी तरी असायलाच हवे.


  नेमका कोणता आजार?
  - ही स्टोरी इंग्लंडच्या हॅम्पशायर प्रांतातील डेनमेड शहरात राहणाऱ्या चार्ली (1) या मुलाची आहे. जन्मापासूनच तो एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. त्याला CCH (काँजेनिटल सेंट्रल हाइपोव्हेंटिलेशन) हा आजार आहे. तो जगभरात 1 हजार लोकांपैकी एकाला होतो आणि अख्ख्या युनायटेड किंगडमध्ये 70 लोकांना हा आजार आहे.
  - या आजारात चार्लीसारखी मुले झोपी जाताच त्यांच्या शरीराचे नर्वस सिस्टिम बिघडतो. झोप लागल्यानंतर शरीरातील संपूर्ण यंत्रणा आपो-आप काम करत नाही. अर्थातच श्वास घेणे सुद्धा कठिण होते. शरीरात ऑक्सिजन कमी होऊन कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते. सामान्य माणसाच्या शरीरात काही बिघाड झाल्यास शरीरातील यंत्रणा मेंदूला संकेत देतात. परंतु, CCH हा रोग झाल्यानंतर ती सिस्टिम कामच करत नाही. अर्थात चार्लीला झोपेत काही झाल्यास तो रिअॅक्ट सुद्धा होऊ शकणार नाही.


  रोज मास्क वापरल्याने बिघडतोय चेहऱ्याचा आकार
  - त्यामुळे, प्रत्येकवेळी चार्ली झोपी गेल्यानंतर त्याच्या शेजारी कुणी तरी राहणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीने बाळ झोपत असल्याचे पाहता त्याला ऑक्सिजन मास्क लावावा लागतो. ऑक्सिजन मास्क लावला नाही तर तो श्वासच घेऊ शकणार नाही. रात्री सुद्धा तो झोपल्यास पालकांपैकी एकाला रात्रभर झोपता येत नाही. याच वयात मुलांचा चेहरा, कान, नाक आणि डोळे आकारत येतात. परंतु, नेहमीच ऑक्सिजन मास्क लावून ठेवल्याने त्याच्या चेहऱ्याचा आकार बिघडला आहे.
  - चार्ली जन्माला आला तेव्हापासूनच त्याला ही समस्या आहे. जन्म घेतला तेव्हा सुरुवातीचे चार महिने त्याला रुग्णालयातच ठेवावे लागले. अजुनही डॉक्टरांनी त्याची काळजी घेण्यास सांगितले आहे. झोपेत त्याच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क नसेल तर त्याचा मृत्यू होऊ शकतो असे डॉक्टरांनी वर्तवले आहे. या आई-वडिलांनी आपली स्टोरी व्यक्त करण्यासाठी आणि मदतीचे आवाहन करण्यासाठी एक फेसबूक पेज देखील तयार केला आहे.

 • Toddler who could die anytime he falls asleep desperate for new life-saving mask to help him breathe
 • Toddler who could die anytime he falls asleep desperate for new life-saving mask to help him breathe

Trending