आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवजात बाळाच्या कानाला झाली गाठ; डॉक्टरांनी जन्मखूण असल्याचे सांगून पाठवले घरी, नंतर झाले असे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रॉयडन- इंग्लंडमध्ये क्रॉयडन शहरात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका दांपत्याला चांगलेच महागात पडले. डॉक्टरांनी बाळाच्या कानावरील गाठीला जन्मखूण असल्याचे सांगून त्यांना घरी पाठवून दिले. डॉक्टरांच्या या निष्काळजीपणामूळे त्या मुलाची गाठ मोठी होत एका टेनिस बॉलएवढी मोठी झाली. त्यानंतर अचानक मुलाची तब्येत बिघडली. मुलाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्याला दुर्मिळप्रकारचा कर्करोग असल्याचे समजले. पुढे अनेक दिवस तो मुलगा कर्करोगाशी सामना करत असताना कोमात गेला. अनेक दिवस उपचार आणि सर्जरी करून मुलाची तब्येत आता व्यवस्थित असल्याचे सांगितले जात आहे. या दांपत्याने बाळाच्या आजाराबद्दल चुकीची माहीती सांगणाऱ्या हॉस्पिटलवर तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

जन्मल्यानंतर काही दिवसांनी बाळाला झाली गाठ

>  अनवर आणि  डेनिया असे या दांपत्याचे नाव असून डिसेंबर 2015 त्यांच्या मुलाचा जन्म झाला होता. जन्मलेल्या बाळाच्या उजव्या कानामागे एक छोटीशी गाठ आली होती. अनवर आणि डेनिया यांनी बाळाच्या गाठीबद्दल विचारले असता डॉक्टरांनी ती जन्मखूण असल्याचे सांगितले. 
> त्यानंतरही दोघांना खात्री न पटल्याने डॉक्टरांनी दोनवेळा बाळाचे MRI स्कॅन केले परंतू तरीसुद्धा डॉक्टरांनी काळजी करण्यासारखे कारण नसल्याचे सांगितले. 
> काही महिन्यांनतर अचानक बाळाची गाठ वाढून टेनिस बॉलएवढी मोठी झाली. त्यानंतर दोघांनी बाळाला सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 
> सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी बाळावर उपचार करण्याआधी त्याचे MRI आणि बायोप्सी टेस्ट केल्या. टेस्ट्सच्या रिपोर्टनुसार बाळाला दुर्मिळ कर्करोग असल्याचे समजले. कर्करोगाचे नाव 'रेहोडोयोसोर्कोमा' असून  तो बाळाच्या जबड्यावर वाढत होता.

 

किमोथेरपीच्या रिअॅक्शनमूळे कोमात गेले मुल

> किमोथेरपी सुरू झाल्यानंतर बाळावर या थेरपीची अॅलर्जिक रिअॅक्शन झाली त्यामूळे बाळाच्या अवयवांनी काम करण बंद केले आणि बाळ कोमामध्ये गेले. 
> बाळाची तब्येत बिघडल्यानंतर त्याला रेस्पिरेटरच्या माध्यमातून कृत्रिम श्वास देऊन डायलिसिसवर ठेवण्यात आले.

 

दोन आठवड्यांत झाला चमत्कार अचानक प्रकृतीत सुधार

> दवाखान्यात डॉक्टरांनी अनेक उपचार केल्यानंतर मुलाच्या प्रकृतीत सुधार होऊ लागले तसेच त्याचा कर्करोग ठिक होऊन त्याची गाठ कमी होऊ लागली. दोन आठड्यांमध्ये मुलाच्या प्रकृतीत सुधार होऊ लागल्यानंतर डॉक्टरांनी मुलाला डिस्चार्ज देण्याची परवानगी दिली. 
> मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये मुलाच्या कर्करोगावरील शेवटच्या स्तरावर उपचार सुरू झाले. डॉक्टरांनी जवळपास 8 तास ऑपरेशन करून बाळाचे ट्यूमर काढून टाकले. ट्यूमर काढताना मुलाच्या चेहऱ्याचे बरेच नुकसान झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याच्या चेहऱ्याच्या मांसपेशी बदलून चेहरा बरा केला. आता मुल पुर्णपणे बरे झाले असून त्याने शाळेत जायला तयारी केली आहे.
> मुलाच्या आई- वडिलांनी त्याच्या जन्मल्यानंतर चुकीची माहीती देणाऱ्या हॉस्पिटल आणि डॉक्टरांविरूद्ध तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...