आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विवाहित महिलांमध्ये रक्तप्रवाह नियंत्रित ठेवतात जोडवे, श्रुंगाराचे वैज्ञानिक महत्त्व 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नानंतर महिला सोळा शृंगार करतात. हिंदू धर्म परंपरांमागे विज्ञानही दडलेले आहे. महिलांनी शृंगार केलेल्या दागिन्यांचेसिद्ध वैज्ञानिक महत्त्व आहे. या सोळा शृंगारांमध्ये 15 वा क्रमांक हा पायाच्या बोटांमध्ये घातल्या जाणाऱ्या जोडव्यांचा येतो. सामान्यतः जोडवे हे चांदीचे असतात. जोडव्यांमध्ये पारंपरिक गुण असण्यासोबतच काही वैज्ञानिक फायदेही आहेत.

  • गर्भावस्थेत फायदेशीर

ज्योतिष व्यतिरिक्त मॉडर्न सायन्सही जोडवे घातल्यामुळे होणाऱ्या फायद्याविषयी सांगते. महिलांच्या पायातील दुसऱ्या बोटातील तंत्रिकेचा थेट संबंध गर्भाशयाशी असतो, जी हृदयापासून जाते आणि याच कारणामुळे उजव्या तसेच डाव्या पायाच्या दुसऱ्या बोटात जोडवे घालण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे गर्भाशय स्वस्थ आणि ब्लडप्रेशर नॉर्मल राहते.

  • शरीरामध्ये ऊर्जा प्रवाह वाढवण्यासाठी पायात चांदीचे जोडवे घालणे उत्तम राहते. चांदी शरीरासाठी थंड मानली जाते. चांदीचे जोडवे घालून जमिनीवर चालल्यास शरीराला सकारात्मक ऊर्जा मिळते. जोडवे धारण केल्यास मेंदू शांत राहतो आणि तणावही कमी होतो.
  • सायटीक नर्व्हच्या एका नसेवर जोडव्यांचा दबाव पडतो आणि यामुळे जवळपासच्या इतर नसांमधील रक्तप्रवाह वाढतो आणि यूट्रस, ब्लॅडर आणि आतड्यांपर्यंत रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. गर्भाशयापर्यंत योग्यप्रकारे रक्त पोहोचते. शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित असल्यास आरोग्य चांगले राहते.
बातम्या आणखी आहेत...