महाभारत / श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पितामह भीष्म यांनी सांगिलते होते सुखी जीवनाचे सूत्र, जे प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवावेत

चवीसाठी नाही तर आरोग्यासाठी जेवण करावे

रिलिजन डेस्क

Jun 22,2019 12:20:00 AM IST

महाभारतानुसार, पितामह भीष्म बाणांच्या शय्येवर पडलेले असताना श्रीकृष्णाने युधिष्ठिरला त्याचे अशांत मन शांत करण्यासाठी भीष्म पितामह यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. धर्माचे ज्ञान असलेल्या व्यक्तींमध्ये भीष्म पितामह सर्वात श्रेष्ठ आहेत. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून युधिष्ठिर, कृष्ण, कृप आणि पांडव कुरुक्षेत्रावर पोहोचले.


मृत्यू शय्यावर पडलेल्या भीष्म यांनी त्यावेळी जे उपदेश दिले त्यामधील काही येथे सांगत आहोत. भीष्म यांनी यादरम्यान राजधर्म, मोक्षधर्म आणि आपद्धर्म इ. मौल्यवान उपदेश विस्तारपूर्वक सांगितले होते. युधिष्ठीरने जेव्हा भीष्म यांना त्यांच्या दीर्घायुष्य आणि निरोगी जीवनाचे रहस्य विचारले तेव्हा भीष्म पितामह यांनी हे 12 गोष्टी सांगितल्या होत्या.


1. मनावर नियंत्रण ठेवणे.
2. गर्व करू नये.
3. वाढत्या इच्छांवर नियंत्रण ठेवणे.
4. कटू शब्द ऐकूनही उत्तर देऊ नये.
5. मार खाल्ल्यानंतरही शांत आणि सम राहणे.
6. अतिथी आणि गरजूला आश्रय द्यावा.
8. नियमपूर्वक शास्त्र वाचणे आणि ऐकणे.
9. दिवसा झोपू नये.
10. स्वतःच्या आदराची इच्छा न ठेवता इतरांना आदर देणे.
11. क्रोधाच्या अधीन राहू नये.
12. चवीसाठी नाही तर आरोग्यासाठी जेवण करणे.

X
COMMENT