आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसच मुख्यमंत्री हाेतील हे सेनेला सांगितले हाेते - अमित शहा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ‘युतीत ज्या वेळी वाटाघाटी झाल्या त्या वेळीच अाम्ही भाजप माेठा पक्ष ठरल्यास देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री हाेतील हे स्पष्ट केले हाेते. पंतप्रधान माेदी व मी स्वत: अनेक सभांमधून तसे जाहीरही केले हाेते. त्या वेळी कुणी अाक्षेप घेतला नाही. अाता शिवसेना नव्या मागण्या करत अाहे त्या स्वीकारणे अाम्हाला शक्य नाही,’ अशा शब्दांत भाजपचे अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी युतीबाबत प्रथमच जाहीर वक्तव्य केले.

राष्ट्रपती राजवटीबाबत :
निकालानंतर महाराष्ट्रात १८ दिवस सत्तास्थापनेची राज्यपालांनी वाट पाहिली. विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर राज्यपालांनी क्रमाक्रमाने प्रमुख पक्षांना निमंत्रित केले. त्या वेळी ना भाजप सत्ता स्थापन करू शकली ना शिवसेना किंवा अाघाडी. राज्यपालांनी काेणालाही संधी नाकारलेली नाही. अाजही ज्याच्याकडे बहुमत अाहे ते राज्यपालांना संपर्क साधून सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात. असे असतानाही कपिल सिब्बल संधी नाकारण्यात अाल्याचे सांगत अाहेत. पक्षीय राजकारणात राज्यपालांसारख्या घटनात्मक पदाला अाेढणे चुकीचे असल्याचे शहा यांनी सांगितले.
 

मुनगंटीवार सरसंघचालकांच्या भेटीला 
नागपूर ।  भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी सायंकाळी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास झालेल्या या भेटीत त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती भागवत यांना दिल्याचे सांगितले जाते. मुख्यालयातून बाहेर पडल्यावर मुनगंटीवार यांनी ‘वेट अँड वाॅच’ एवढीच प्रतिक्रिया दिली. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात राजकीय जवळीक वाढत असल्याचे बोलले जात असताना मुनगंटीवार यांनी ‘वाॅच’ या शब्दावर जाेर देत राष्ट्रवादीच्या घड्याळाकडे इशारा केल्याचा अर्थ यातून काढला जात आहे.
 

राष्ट्रवादीचे ९ आमदार संपर्कात; भाजप खासदार निंबाळकर नाईकांचा दावा

माढा - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार हे राज्यभरात सहानुभूती निर्माण करण्यात यशस्वी ठरले. राष्ट्रवादीला यंदा चांगले यश मिळाले. त्यात साताऱ्यात पावसाळ्यातील सभा ही फायदेशीर ठरली. मात्र अाता काँग्रेस व राष्ट्रवादीचे ९ आमदार माझ्या संपर्कात आहेत. मात्र त्यांची नावे अाताच सांगणे याेग्य नाही,’ असा दावा माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला. भाजप-शिवसेना ही भावंडे आहेत. ती एकत्रच येतीलच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष असलेल्या निंबाळकरांनी लाेकसभा निवडणुकीच्या ताेंडावर भाजपात प्रवेश केला हाेता. ते म्हणाले, ‘ जनमताचा काैल व महायुतीचा अादर शिवसेनेने करावा.’

बातम्या आणखी आहेत...