Home | Jeevan Mantra | Dharm | Shri Krishna told what every human should do every day

अश्वमेधिक पर्वामध्ये श्रीकृष्णाने युधिष्ठिरला सांगितले आहे की, मनुष्याने प्रत्येक दिवशी काय-काय करावे

रिलिजन डेस्क, | Update - Jun 22, 2019, 12:15 AM IST

दान गुप्त पद्धतीने करावे आणि कधीही केलेल्या दानाचा हिशोब करू नये 

 • Shri Krishna told what every human should do every day

  महाभारतातील अश्वमेधिक पर्वामध्ये युधिष्ठिर आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामधील संवादाविषयी सांगण्यात आले आहे. युधिष्ठिरने भगवान श्रीकृष्णाला विचारले होते की, कोणत्या लोकांचे आयुष्य नेहमी सुखी राहते, कोणते लोक मृत्यूनंतर स्वर्गात जातात किंवा मोक्ष प्राप्त करतात. भगवान श्रीकृष्णाने या प्रश्नाचे उत्तर एका श्लोकाच्या माध्यमातून दिले. श्लोकानुसार जो मनुष्य हे 4 काम करतो त्याला निश्चितच स्वर्ग प्राप्त होतो.


  श्लोक-
  दानेन तपसा चैवसत्येन च दमेन च।
  ये धर्ममनुवर्तन्ते ते नराः स्वर्गगामिनः॥ (महाभारत - अश्वमेधादिकम् पर्व- अध्याय 106)


  1. दान
  दान करणे हिंदू धर्मात खुप पुण्याचे काम मानले जाते. अनेक ग्रंथांत दान करण्याच्या महत्त्वाविषयी सांगितले आहेत. श्रीमद्भगवतः नुसार जो मनुष्य गरजु लोकांना नियमित दान करतो त्याला पुण्य प्राप्ती होते. मनुष्याने कधीच आपल्या दानाचा हिशोब ठेवू नये. गुप्त पद्धतीने दान करावे. दान केल्याचा दिखावा करु नये. जो दान संबंधीत या गोष्टींना लक्षात ठेवतो त्याचे सर्व पाप कर्म मिटतात आणि त्याला स्वर्ग प्राप्ती होते.


  2. मन नियंत्रणात ठेवणे
  मनुष्याचे मन खुप चंचल असते. मन प्रत्येक वेळी भटकत राहते. ज्या मनुष्याचे मन नियंत्रणात नसते तो खुप जास्त महत्त्वाकांक्षी असतो. असा मनुष्य आपल्या इच्छा पुर्ण करण्यासाठी कोणतेही चुकीची कामे करु शकतो. त्याला आपल्या पाप कर्मामुळे नरकात जावे लागते. यामुळे स्वर्गाची इच्छा ठेवणा-यांना आपल्या मनाला नियंत्रणात ठेवणे खुप आवश्यक आहे.


  3. नेहमी खरे बोलणे
  खरे बोलणे मनुष्याच्या सर्वात खास गुणांपैकी एक आहे. ज्या मनुष्यात खरे बोलण्याचा गुण असतो त्याला प्रत्येक ठिकाणी यश मिळते. खोटे बोलणा-या किंवा खोट्याची साथ देणा-या माणसाला पापाचे भागीदार मानले जाते आणि त्याला नर्क यातना झेलाव्या लागतात. यामुळे, प्रत्येकाला खरे बोलणे आणि प्रत्येक परिस्थितीत ख-याची साथ देण्याचा गुण अवलंबवला पाहिजे.


  4. तपस्या
  तप आणि देवाचे ध्याने करण प्रत्येकासाठी आवश्यक मानले जाते. अनेक लोक आपल्या व्यस्त जीवनामुळे देवाचे ध्यान करत नाही. अशा मनुष्यावर देवी-देवता नेहमी रुष्ठ राहतात. नियमित थोडा वेळ देवाच्या तपासाठी आणि ध्यानासाठी दिल्याने मनुष्याच्या सर्व अडचणी दूर होतात आणि त्याला स्वर्ग प्राप्ति होते.

Trending