toll plaza / भाजपचे ओळखपत्र दाखवल्यास टोल माफ; भाजप नेत्याचा दावा

‘महसूलमंत्र्यांचा फोटाे पाहून कर्मचारी दबकतात’, सरचिटणीस हाळवणकर यांचा घरचा आहेर 

प्रतिनिधी

Jul 16,2019 08:09:00 AM IST

सांगली - भाजपचे ओळखपत्र असलेले कार्यकर्ते व नेत्यांना राज्यात टोल आकारला जात नाही, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला आहे. मिरज येथे आयोजित केलेल्या विभागीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे आणि प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे उपस्थित होते.


भाजपच्या ओळखपत्रावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रदेश सरचिटणीस यांची छायाचित्रे असल्याने टोल नाक्यावरील कर्मचारी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून टोल आकारणी करत नाहीत, असा दावा करताना हे कायदेशीर नाही, याची आपल्याला माहिती आहे. मात्र, टोल कर्मचारी महसूलमंत्र्यांचा फोटो पाहून अशा वाहनांना माफी देतात, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली. सध्या भाजपची सदस्य नोंदणी सुरू असल्याने या दाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

भाजपला टोल नाक्याचे कर्मचारी घाबरतात
भाजपचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर कार्यकर्त्यांना जी पावती दिली जाते त्या पावतीवरही टोल नाका माफ केला जातो, अशी आपल्याला माहिती मिळाली आहे. प्रत्यक्षात हे कायदेशीर नाही. मात्र, सध्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा राजकीय दबाव मोठ्या प्रमाणात असल्याने टोलवरील कर्मचारी घाबरतात आणि वादावादी नको म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना टोलमाफी मिळते, असे वक्तव्यही त्यांनी केले.

X
COMMENT