आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुखण्याने त्रस्त आहात? पेनकिलर नको, टोमॅटो खा 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तसे पाहिले तर प्रत्येक भाजीपाल्यात काही ना काही औषधी गुण आहेत. शास्त्रज्ञांच्या मतानुसार, 'टोमॅटोत दुखणे दूर करण्याची शक्ती आहे. अॅस्पिरिन या पेनकिलरला टोमॅटो पर्याय होऊ शकेल.' अॅस्पिरिन हे दुखणे दूर करणारे आणि रक्त पातळ करणारे औषध आहे. टोमॅटोतही दुखणे दूर करण्याचे आणि रक्ताला पातळ करण्याचे औषधी गुण असल्याचे पुढे आले आहे. 


टोमॅटोच्या बियांपासून तयार केलेला रस हा रक्ताचा प्रवाह वाढवतो आणि रक्ताच्या गुठळ्या होऊ देत नाही, असे रोवेट संस्थानातील प्रो. सर असीम दत्त रॉय यांच्या संशोधनातून पुढे आले आहे. युरोपियन युनियनच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी या संशोधनाला मान्यता दिली आहे. या संशोधनाने जगभरातील कोट्यवधी लोकांना दिलासा मिळाला आहे. रक्त पातळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अॅस्पिरिनमुळे अल्सरसारख्या दुष्परिणामास सामोरे जावे लागते. 


प्रो. असीम दत्त रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार टोमॅटोचे साइड इफेक्ट नाहीत. या संशोधनात आढळले आहे की, टोमॅटो रस किंवा टोमॅटो खाल्ल्यानंतर तीनच तासांत त्याचा सकारात्मक परिणाम होऊ लागतो. टोमॅटो सूप किंवा टोमॅटो बियांचे जल अॅस्पिरिनला पर्याय म्हणून पुढे आल्याने नैसर्गिक जीवनशैलीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...