आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटारसायकलवरून फिरायला गेलेल्या दोन मित्रांवर काळाचा घात, डोंगरावरून पडले मोठ-मोठी दगडं अन...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिकांगपिओ- बुलेटवर प्रेक्षणीय स्थळांची भ्रमंती करण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांवर काळाने मोठा घात केला आहे. ही घटना रविवारी सकाळी रिकांगपियोजवळ घडली. कांगडा येथील रहिवाशी सुनील कुमार आणि पंजाबच्या जीरकपूरचा रहिवाशी इशान फिरण्यासाठी हिमाचलप्रदेशच्या काजा येथे गेले होते. यादरम्यान ते पांगी नालाकडे जात असताना अचानक डोंगरावरून त्यांच्यावर मोठ-मोठी दगडं कोसळली. त्याखाली दबून दोघांचाही जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. तसेच, पोलिस खटला दाखल करून पुढील तपास करत आहेत.

 

अधिक माहितीनुसार, काजा हायवेवर असलेल्या पांगी नालाकडे रविवारी सकाळी हे दोन्ही मित्र बुलेटवर जात होते. यादरम्यान अचानक डोंगरावरून काही दगड त्यांच्यावर पडले. सध्या काजा हायवेचे काम सुरू असल्यामुळे डोंगराला ब्लास्टिंग करून फोडले जात आहे. त्यामुळे डोंगराचा बराच भाग खिळखिळा होत आहे. घटनेत ठार झालेल्या दोन्ही तरूणांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी रिकांगपिओ येथे पाठवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...