आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आज अर्ध्या रात्री संपेल 'बिग बॉस 13' चा प्रवास, 140 दिवस चालले आतापर्यंतचे सर्वात मोठे सीजन

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : सलमान खानचा वादग्रस्त रियलिटी शो 'बिग बॉस 13' चा ग्रँड फिनाले आज रात्री टेलीकास्ट होईल. घरात 5 कन्टेस्टंट्स सिद्धार्थ शुक्ला, रश्मि देसाई, आरती सिंह, पारस छाबडा आणि शहनाज गिल उरलेले आहेत आणि यांपैकी एका कन्टेस्टंट्च्या हाती विजेतेपद लागेल. आधी चर्चा हि होती कि, शो दोन आठवड्यांसाठी वाढवला जाईल. पण हा केवळ अंदाज निघाला. यादरम्यान 'बिग बॉस' च्या अधिकृत ट्विटर हँडलवर घोषणा केली गेली की, शनिवारी शोचा ग्रँड फिनाले टेलीकास्ट होईल.  

हे सीजन आधी 5 आठवड्यांसाठी वाढवले गेले होते. 29 सप्टेंबरला याची सुरुवात 13 कन्टेस्टंटसोबत झाली आणि जानेवारीमध्ये याचा ग्रँड फिनाले होणार होता. मात्र, वाढत्या लोकप्रियतेमुळे हे 5 आठवड्यांसाठी वाढवले गेले. 15 फेब्रुवारीला शोचा ग्रैंड फिनाले आहे. यानुसार या सीजनचा एकूण कालावधी 140 दिवसांचा असेल. जो शोच्या इतिहासात सर्वात जास्त आहे. एवढेच नाही, हे एकुलते एक सीजन आहे, ज्यामध्ये आतापर्यंत 12 व्हाइल्डकार्ड कन्टेस्टंटने एंट्री घेतली आहे.   

0