आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोनी आणि एमी अवॉर्ड विजेते अभिनेते रॉन लीबमन यांचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड डेस्कः  'फ्रेंड्स' या गाजलेल्या मालिकेत डॉ. लियोनार्ड ग्रीनची भूमिका वठवणारे ज्येष्ठ अभिनेते रॉन लीबमन यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झआले. रॉन यांचे मॅनेजर रॉबर्ट एट्टरमन म्हणाले की, त्यांच्या निधनाने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. निमोनियामुळे रॉन यांचे निधन झाले.  'एंजल्स इन अमेरिका' या चित्रपटातील रॉय कोह्न या भूमिकेसाठी रॉन यांना टोनी अवॉर्ड  मिळाला होता. तर 'काज' या टीव्ही सीरिजसाठी त्यांना एमी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.


1956  'द एज ऑफ नाईट' या मालिकेतून करिअरची सुरुवात करणा-या रॉन यांनी 1970 साली 'वेयर इज पोपा' या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांनी जॉर्ज सीगलच्या भावाची भूमिका वठवली होती. आपल्या सहा दशकांच्या दीर्घ करिअरमध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या ड्रामा आणि कॉमिक भूमिका वठवल्या. त्यांना विशेषतः फ्रेंड्स या टीव्ही शोमधील डॉ. लियोनार्ड ग्रीनच्या भूमिकेसाठी ओळखले जाते.


रॉन यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1937 रोजी मॅनहॅटनमध्ये झाला होता. त्यांचे वडील कपड्यांचे व्यवसायी तर आई गृहिणी होती. वयाच्या सहाव्या वर्षी रॉन यांना पोलिओ झाला होता. त्यामुळे अनेक महिने त्यांना रुग्णालयात काढावे लागले होते. त्यानंतर काही काळाने त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता. 1958 साली रॉन हे न्यूयॉर्कमध्ये आले आणि येथे त्यांनी अॅक्टर्स स्टूडियोत प्रवेश घेतला. 1969 आणि 1970 च्या काळात त्यांना 'वी बॉम्ब्ड इन हेवन'साठी  ड्रामा डेस्क अवॉर्ड मिळाला होता. 
 

बातम्या आणखी आहेत...