फ्लॅशबॅक 2018 : / फ्लॅशबॅक 2018 : 'अॅवेंजर्स इनफिनिटी वॉर'पासून ते 'डेडपूल-2' पर्यंत, हे आहेत हॉलिवूडचे 10 सर्वात जास्त कमाई करणारे चित्रपट

या लिस्टमध्ये सर्वात पहिला चित्रपट आहे 'अॅवेंजर्स'.. 

Dec 30,2018 12:07:00 AM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : याचवर्षी हॉलिवूडच्या चित्रपटांचीही इंटरनेटसोबतच बॉक्स ऑफिसचेही रिकॉर्ड तोडले. 2018 मध्ये सुपरहीरो आणि फिक्शन चित्रपटांना सर्वात जास्त पसंती दिली गेली. जिथे बॉलिवूडच्या काही मोठ्या बजेटच्या आणि मोठ्या स्टार्सच्याही चित्रपटांना अपयश आले, तिथे हॉलिवूडमध्ये मात्र मार्वल कॉमिक्स भूमिकांचा जलवा कायम राहिला.

पुढे पहा 2018 चे सर्वात जास्त कमाई करणारे चित्रपट..

अॅवेंजर्स 27 एप्रिलला रिलीज झालेला मार्वल्स स्टूडियोच्या मल्टीस्टारर सुपरहीरो फिल्मने जगभरातील स्क्रीन्स कॅप्चर केल्या. या चित्रपटाने एकूण 2,048 बिलियन डॉलरची कमाई केली. फिल्मने भारतात दोन आठवड्यातच 200 कोटींचा एकदा पार केला. याचा सीक्वल एवेंजर्स एंडगेम पुढच्यावर्षी 26 एप्रिलला रिलीज होणार आहे.ब्लॅक पँथर चैडविक बोसमैन स्टारर ब्लॅक पँथर 1, 347 बिलियन डॉलर्ससोबत या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. 16 फेब्रुवारीला रिलीज झालेल्या या फिल्मने भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्या वीकएंडमधेच 15 कोटी रुपयांपेक्षा जास्तही कमाई केली.जुरासिक वर्ल्ड : फॉलन किंगडम 1,035 बिलियन डॉलर्सची कमाई करत क्रिस प्रैट आणि जेफ गोल्डब्लम स्टारर हा चित्रपट 2018 च्या टॉप ग्रॉसिंग चित्रपटांपैकी एक आहे. जुरासिक वर्ल्ड सीरीजचा हा चित्रपट जगभरात खूप पसंत केला गेला. 7 जूनला भारतात रिलीज झाल्यानंतर चित्रपटाने दोन आठवड्यातच 100 कोटी रुपये आपल्या क्लबमध्ये सामील करून घेतले. यूएसमध्ये ही फिल्म 22 जूनला रिलीज झाली.इनक्रेडेबल्स-2 डिज़्नी पिक्सरची एनीमेटेड फिल्म 1,242 बिलियन डॉलर्ससोबत चौथ्या क्रमांकावर आहे. फिल्म भारतात 22 जूनला रिलीज झाली होती. फिल्मने भारतात सुरुवातीच्या 5 दिवसांमध्येच 22 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. फिल्मचे लीड पेयर इलास्टा गर्ल आणि मिस्टर इनक्रेडेबलचा आवाज बॉलिवूड स्टार काजोल आणि शाहरुख खानने दिला होता. इनक्रेडेबल कपलच्या मुलाचा आवाज शाहरुखचा मुलगा आर्यनने दिला होता.वेनम टॉप ग्रॉसिंग चित्रपटांमध्ये पाचव्या क्रमंकावर टॉम हार्डी स्टारर फिल्म वेनम आहे. वेनमने जगभरात एकूण 854 मिलियन डॉलर्सची कमाई केली आहे. या लिस्टमध्ये वेनम मार्वल्स स्टूडियोची तिसरी फिल्म आहे. फिल्मने आपल्या पहिल्याच आठवड्यात इंडियामधून जवळपास 16 कोटी रुपये कमवले होते.मिशन: इंपॉसिबल फॉलआउट मिशन इंपॉसिबल सीरीजची सहावी फिल्म या लिस्टमधेही सहाव्या क्रमांकावर आहे. फिल्मने जगभरात 791 मिलियन डॉलर्स कमावले. रिलीजच्या पहिल्या वीकएंडमध्ये फिल्मने भारतीय बॉक्स ऑफिसवर 56 कोटींची कमाई केली.डेडपूल-2 सीरीजची दुसरी फिल्म डेडपूल-2 2018 मध्ये सातव्या क्रमांकावर जास्त कमाई करणारी हॉलिवूड फिल्म आहे. मार्वल्सच्या या लिस्टमधील चौथ्या चित्रपटाने 736 मिलियन डॉलर्स कमावले. रयान रेनॉल्ड्स स्टारर फिल्म भारतात खूप पसंतीस उतरली. फिल्मने पहिल्या आठवड्यातच इंडियन मार्केटमधून 50 कोटी रुपये कमावले.बोहेमियन रैपसोडी ब्रिटिश रॉक बैंड क्वीनवर बेस्ड बायोग्राफिकल फिल्म बोहेमियन रैपसोडी जगभरातून एकूण 667 मिलियन डॉलर्सची कमाई करत या लिस्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. 16 नोव्हेंबरला भारतात रिलीज झालेली हि फिल्म अजूनही अनेक थिएटर्समध्ये चालू आहे.एंट मैन एंड द वास्प मार्वल्सची ही सुपरहीरो फिल्म जगभरातून 623 मिलियन डॉलर्सची कमाई करणारी ठरली. भारतात पहिल्या वीकएंडमधेच फिल्मने 25 कोटी रुपये कमावले.फैंटास्टिक बीस्ट्स : द क्राइम्स ऑफ ग्रिन्डेलवॉल्ड हैरी पॉटर प्रीक्वल सीरीजची ही दुसरी फिल्म 2018 मध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या लिस्टमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे. फिल्मने जगभरातून 612 मिलियन डॉलर्स कमावले.
X