आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस 12 - कुणी वकील तर कुणी डेंटिस्ट, हे आहे घरातील टॉप 6 कन्टेस्टंटचे बॅकग्राउंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : रविवारी टेलीकास्ट झालेला वीकेंड का वार या एपिसोडदरम्यान बिग बॉसची कंटेस्टेंट सोमी खान घरातुन बाहेर गेली. घरात आता फक्त करणवीर बोहरा, दीपक ठाकुर, सुरभि राणा, रोमिल चौधरी, एस. श्रीसंत आणि दीपिका कक्कड़ वाचले आहेत. मागच्या आठवड्यात झालेला टिकट टू फिनाले टास्क जिंकून सुरभि राणाने 30 डिसेंबरला होणाऱ्या फायनलमध्ये डायरेक्त्त क्वालिफाई केले आहे. आता घरातल्या बाकी सदस्यांमध्ये टक्कर होणार आहे.  30 डिसेंबरला बिग बॉस ला आपला नवीन विनर मिळणार आहे. 

आज बघुयात बिग बॉस 12 घरातील 6 कंटेस्टेंटचे प्रोफाइल... 

 

हे आहेत बिग बॉस 12 चे सहा कंटेस्टेंट.. 
सुरभि राणा

21 सप्टेंबर 1991 ला हिमाचल प्रदेशच्या हमीरपुरमध्ये जन्मलेली सुरभि व्यवसायाने डेंटिस्ट आहे. सुरभिचे वडीलांचे नाव विक्रम राणा आहे आणि तिच्या आईचे नाव राजेश्वरी राणा आहे. विक्रम हिमाचल प्रदेश राज्य परिवहनमध्ये अधिकारी होते, राजेश्वरी एका शाळेत प्रिंसिपल होत्या. सुरभिचे दोन भाऊ आहेत. आणि ते दोघेही डॉक्टर आहेत. एवढेच नाही तर तिचा पती अभिनव राणाही डॉक्टर आहे. सुरभि राणा एमटीवी रोडीज़ एक्सट्रीम 2018 शो ची कन्टेस्टंटही होती. बिग बॉस मध्ये सुरभिने वाइल्ड कार्डद्वारे एंट्री घेतली होईतो. 

 

रोमिल चौधरी
मार्च 1991 मध्ये हरियाणाच्या करनालमध्ये जन्मलेला रोमिल व्यवसायाने वकील आहे. तो चंडीगढ़ उच्च न्यायालयात वकील आहे. शेतकरू कुटुंबात जन्मलेलय रोमिलचे लग्नही झाले आहे आणि त्याला एक मुलगादेखील आहे. रोमिलने दोनवेळा एमटीवी रोडीजसाठी ऑडिशन दिले पण सिलेक्त झाला नाही. बिग बॉस 12 मध्ये रोमिलने आपला मित्र निर्मल सिंहसोबत नॉर्मल जोडी म्हणून प्रवेश केला होता पण नंतर त्याला एविक्शन झेलावे लागले होते. त्यानंतर त्याने वाइल्ड कार्डद्वारे सुरभि राणासोबत एंट्री केली. 

 

करणवीर बोहरा
28 ऑगस्ट 1982 ला राजस्थानच्या जोधपुरमध्ये जन्मलेला करणवीर अभिनेता आणि प्रोड्यूसर आहे . तो डिजाइनिंगही करतो. त्याने बालकलाकारांच्या रूपात 'तेजा' नावाच्या चित्रपट काम केले आहे. त्यानंतर त्याने 'किस्मत कनेक्शन', 'लव यू सोनिए' आणि 'पटेल की पंजाबी शादी' यांसहित एकूण 7 चित्रपटात काम केले आहे. 'शरारत' नावाची त्याची एक टीव्ही सीरिअलही होती. त्यांनतर त्याने 'सीआईडी', 'कसौटी जिंदगी की', 'सौभाग्यवती भव', 'नागिन' अशा सीरिअलमध्येही अक्म केले. त्याच्या पत्नीचे नाव टीजे सिद्धू आहे . या दोघांना दोन मुली आहेत त्यांचे नाव वियना आणि राया बेला आहे. 

 

दीपिका कक्कड़
6 ऑगस्ट 1986 ला महाराष्ट्रतील पुण्यामध्ये जन्मलेली दीपिका टीव्ही अभनेत्री आहे. मुंबई विश्वविद्यालय येथून ग्रेजुएशन करून दीपिकाने एयर होस्टेस म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मात्राव नंतर ती अभिनय क्षेत्रातही अली. 'नीर भरे तेरे नैना देवी' या सीरिअलने तिने डेब्यू केला. मात्र तिला ओळख पहचान 'ससुराल सिमर का' या मालिकेने लिमवून दिली. याच मालिकेतील तिचा को स्टार शोएब इब्राहिमसोबत तिने दुसऱ्यांदा याचवर्षी लग्न केले. बिग बॉस 12 तिची आणि श्रीसंतची बॉन्डिंग खूप घट्ट आहे. 

 

एस श्रीसंत
6 नोव्हेंबर 1983 ला केरलच्या कोठामंगलममध्ये जन्मलेला शांताकुमारन श्रीसंत क्रिकेटर आहे. आईपीएलमध्ये फिक्सिंगमुळे 2013 मध्ये बीसीसीआईने त्याला खेळण्यावर लाइफटाइम बॅन लावले होते. मात्र नंतर कोर्टने त्याला आरोपातून मुक्त केले. श्रीसंतची बहीण केरळची टीव्ही अभिनेत्री आहे आणि त्याचा भाऊ संगीत कंपनीचा मालक आहे. श्रीसंतला एक्टिंगचीही आवड आहे. क्रिकेट करियरदरम्यान वादाच्या भोवऱ्यात राहिलेला श्रीसंत बिग बॉसमधेही वादग्रस्त कंटेस्टेंटपैकी एक आहे. घरात सुरभि राणासोबत झालेले वाद तर सर्वांचा ठाऊक आहेत. मात्र श्रीसंतची दीपिकासोबत चांगली बॉन्डिंग आहे. 

 

दीपक ठाकुर
24 मार्च 1994 ला बिहारच्या बक्सरमध्ये जन्मलेला दीपक गायक आहे. बिग बॉसच्या घरात तो आपल्या स्वच प्रतिमेची ओळखला जातो. यामुळेच प्रेक्षक त्याला पसंती देतात. शेतकरू कुटुंबात जन्मलेल्या दीपकने 2012 मध्ये आलेला चित्रपट 'गैंग्स ऑफ वासेपुर' मध्ये 'हमनी के छोड़ दी' या गाण्यासाठी आपला आवाज दिला आहे. याव्यतिरिक्त तो 'गैंग्स ऑफ वासेपुर' त्याने 'मुरा-मॉर्निंग' आणि 'मुक्काबाज के अधूरा मैं' या गाण्यांनाही आपला आवाज दिला आहे. बिगबॉसमध्ये दीपकने आपल्या एका प्रेक्षकांसोबत नॉर्मल जोडी म्हणून एंट्री घेतली होती. 

बातम्या आणखी आहेत...