विदेशात झाला होता / विदेशात झाला होता रतन टाटांनी अपमान.. त्यांनी 9 वर्षांनी 9300 कोटी रुपये मोजून घेतला होता अपमानाचा बदला

Dec 29,2018 03:00:00 PM IST

मुंबई- कॉर्पोरेट वर्ल्डमधील प्रत्येक जण प्रसिद्ध उद्योजक व टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्या कार्यशैलीचा चाहता आहे. रतन टाटांनी विखुरलेल्या कंपन्या एकत्र करून 'टाटा' हा ग्लोबल ब्रॅंड उदयास आणला. टाटांच्या या नेतृत्त्वाचे देशातच नव्हे तर विदेशात कौतुक झाले. रतन टाटांचा आज (28 डिसेंबर) वाढदिवस आहे. यानिमित्त आम्ही आपल्याला त्यांच्याविषयी रोचक माहिती घेऊन आलो आहे.

रतन टाटांचा एकदा विदेशात अपमान झाला होता. मात्र, ते खचले नाहीत. त्यांनी 9300 कोटी रुपये मोजून या अपमानाचा बदला घेतला. या प्रकारामुळे ऑटो सेक्टरमध्ये खळबळ उडाली होती.

पुढील स्लाइडवर वाचा, रतन टाटांनी अपमानाचा बदला घेण्यासाठी खरेदी केली चक्क कंपनी...

रतन टाटा यांनी अपमानाचा बदला घेण्यासाठी चक्क जग्वार लॅण्ड रोव्हर (जेएलआर) कंपनीच खरेदी केली होती. टाटा यांनी जग्वार कंपनीसाठी सुमारे 9300 कोटी रुपये मोजले होते. रतन टाटा यांनी अपमानाचा बदला घेण्याच्या उद्देशाने जग्वार कंपनी खरेदी केल्याची माहिती त्यांचे निकटवर्तीय प्रवीण काडले यांनी सांगितली. सामान्य व्यक्ति जास्त आक्रमक असतो, असे म्हटले जाते. कारण, तो अपमानाचा बदला तत्काळ घेत असतो. परंतु,एखादा प्रतिष्ठीत व्यक्ति फार संयमी असतो. तो अपमानाचा विजयाचे साधन म्हणून वापर करतो आणि तेच रतन टाटा यांनी केले होते. टाटांनी 1998 मध्ये हॅचबॅक कार इंडिका बाजारात उतरवली. परंतु, एक वर्ष झाले तरी ग्राहक कारकडे पाहात नसल्याचे दिसले. तेव्हा काही लोकांनी टाटांना कार डिव्हिजन विक्री करण्याचा सल्ला दिला. टाटांनी देखील त्या दिशेने निर्णय घेतला होता. कार डिव्हिजनसाठी अनेक कंपन्यांशी संपर्क करण्यात आला. त्यात अमेरिकन कंपनी फोर्डने उत्सुकता दाखवली. फोर्डचे अधिकारी टाटा मुख्यालय बॉम्बे हाऊसमध्ये आले. त्याच्याच चर्चा झाल्यानंतर टाटाच्या अधिकार्यांना फोर्ड हेडक्वॉर्टर डेट्रॉयटला बोलवण्यात आले. रतन टाटा यांच्यासोबत काडले हे देखील डेट्रायट येथे गेले होते. दोन्ही कंपन्यांच्या अधिकार्यांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली. परंतु, फोर्डच्या अधिकार्यांनी वर्तवणूक ही अपमानजनक होती. तुम्हाला कार निर्मिती क्षेत्रातील माहिती नाही तर बिझनेस का सुरु केला. कंपनी खरेदी करून आम्ही तुमच्यावर एकप्रकारे उपकारच करत आहोत. असे म्हणत फोर्ड चेअरमन बिल फोर्ड यांनी रतन टाटा यांना अपमानीत केले. रतन टाटांना मोठे दु:ख झाले. मात्र, त्यांनी ते दाखवले नाही. डेट्रॉइटहून न्यूयॉर्कला येण्याच्या निर्णय घेतला. 90 मिनिटांच्या प्रवासांत रतन टाटा हे नाराज दिसत होते. पुढील स्लाइडवर वाचा, असा झाला रतन टाटांचा विजय...या घटनेच्या नऊ वर्षांनी 2008 मध्ये फोर्ड कंपनी दिवाळखोरीच्या मार्गावर होती. अमेरिकेतील ऑटो हब डेट्रॉयटची आर्थिक स्थिती देखील दिवसेंदिवस खराब होत होती. तेव्हा टाटा यांनी फोर्ड कंपनीचा लक्झरी ब्रँड जग्वार लॅण्ड रोव्हर (जेएलआर) खरेदी करण्याचा निर्णय घेतला. फोर्डचे अधिकारी चर्चा करण्यासाठी बॉम्बे हाऊसमध्ये पोहोचले. सौदा 2.3 अब्ज डॉलर (जवळपास 9300 कोटी रुपये) मध्ये ठरला. तेव्हा फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड हे रतन टाटा यांना म्हटले, ‘जेएलआर खरेदी करून तुम्ही आमच्यावर मोठे उपकार केले आहेत.’; आणि हाच रतन टाटांचा विजय होता. दरम्यान, त्याकाळात जेएलआर तोटात होती. मात्र, काही वर्षातच टाटा जेएलआरने तोटा भरुन काढला होता.
X