आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील या 5 शहरांमध्ये मिळते सर्वाधिक सॅलरी, जाणून घ्या कोणत्या सेक्टरमध्ये मिळते जास्त सॅलरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - जास्त पगार कोणाला नको असतो? पण तुम्हाला माहीत आहे का सर्वांत जास्त सॅलरी देशातील कोणत्या शहरात मिळते. लिंक्डइनच्या एका अभ्यासानुसार सर्वाधिक पगार देशातील बेंगळुरूमध्ये मिळतो. त्यानंतर मुंबई आणि दिल्लीचा क्रमांक लागतो. सर्वाधिक सॅलरी देण्याऱ्या सेक्टरच्या बाबतीत सांगायचे झाले तर यामध्ये हार्डवेअर आणि नेटवर्किंग, सॉफ्टवेअर आणि आयटी सर्व्हीसेस तसेच कॉम्यूटर सेक्टरच अव्वल स्थानी आहे. 

 

> लिंक्डइने केलेल्या एका सर्व्हेत सांगितले की, देशाची आईटी राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूमध्ये सर्वाधिक पगार देण्यात येतो. सर्व्हेनुसार बेंगळुरमध्ये प्रतीवर्षी सरासरी 11.67 लाख रूपये वेतन आहे. यानंतर मुंबईमध्ये 9.03 लाख रूपये वार्षिक वेतन दिले जाते. तर देशाची राजधानी असलेल्या दिल्ली एनसीआरमध्ये मिळणारे वार्षिक वेतन 8.99 लाख रूपये आहे. वेतन मिळण्याच्या बाबतीत हैदराबाद (8.45 लाख रूपये) आणि चेन्नई (6.30 लाख रूपये) यांचा अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक लागतो.

 

> सर्वाधिक पगार देणाऱ्या क्षेत्रांविषयी सांगायेच झाले तर यामध्ये हार्डवेअर आणि नेटवर्किंग सेक्टर अव्वल स्थानी आहे. या क्षेत्रामध्ये सरासरी 14.72 लाख रूपये वार्षिक वेतन दिले जाते. तर सॉफ्टवेअर आणि आयटी सर्व्हीसेस 12.05 लाख रूपयांसह दुसऱ्या स्थानी आहे. कंज्यूमर गुड्स (9.95 लाख रूपये) आणि हेल्थकेअर (9.59 लाख रूपये) या क्षेत्रांचा अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक येतो. तर पाचव्या स्थानी असलेल्या फायनान्स सेक्टरमध्ये 9.47 लाख रूपये वार्षिक वेतन मिळते.
   
> तज्ञांच्या मते, भारतामध्ये चिप डिझाइनच्या निर्मितीला गती आल्यामुळे मागील काही वर्षांपासुन हार्डवेअर नेटवर्किंग क्षेत्रात पगाराचा आकडा वाढला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या इतर सर्व्हेक्षणानुसार बऱ्याच नियोजकांच्या मते, या क्षेत्रांमध्ये आणखी वेतन वाढण्याची आशा वर्तवण्यात येत आहे. 2019 मध्ये हा आकडा 15 % ने वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

बातम्या आणखी आहेत...