आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या स्वस्त कारवर फिदा आहेत भारतीय, महिन्याच्या टॉप सेलिंग लिस्टमध्ये आहे नंबर 1

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क: मध्यम वर्गीय कुटूंबासाठी एक कार अनेक वर्षांसाठी असते. अशा वेळी नवीन कार खरेदी करण्यापुर्वी बजेट आणि ब्रांडसोबतच रिव्ह्यू खुप गरजेचा असतो. प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की, त्याला कमी किंमतीत दमदार मायलेजची कार मिळावी. यासोबतच मेंटेनेंससाठी एक रुपयाही खर्च करावा लागू नये. अशा वेळी मार्केटमध्ये कोणती कार सर्वात जास्त खरेदी केली जातेय याची माहिती काढणे आवश्यक असते. यासाठी Cumulative Sales प्रत्येक महिन्यात सर्वात जास्त विकणा-या टॉप-10 कारची लिस्ट जारी करते.


ऑगस्ट 2018 मध्ये सर्वात जास्त सेल होणारी कार 

Rank Model Sales Figures
1 Maruti Alto 22237
2 Maruti Dzire 21990
3 Maruti Swift 19115
4 Maruti Baleno 17713
5 Maruti WagonR 13658
6 Maruti Vitara Brezza 13271
7 Hyundai Grand 110 11489
8 Hyundai Elite i20 11475
9 Hyundai Creta 10394
10 Honda Amaze 9644
 

 

 

मारुती सुजुकी आल्टो आहे मोस्ट सेलिंग कार 

मारुती सुजुकी भारतातील बेस्ट सेलिंग कार कंपनी आहे. या कंपनीची कार मध्यम वर्गीय कुटूंबाच्या बजेटमध्ये असते, यासोबतच मेंटेनेंसच्या नावावर यासाठी काहीच खर्च करावा लागत नाही. याच कारणांमुळे टॉप-10 कारच्या लिस्टमध्ये मारुतीच्या 6 कारचा समावेश आहे. परंतु या लिस्टमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी आल्टो टॉपवर आहे. मारुतीची आल्टो 800cc आणि 1000cc च्या इंजिनमध्ये येते.

 

किंमत कमी, मायलेज जास्त 
Alto 800 दोन मॉडलमध्ये येते. यामध्ये एक LXI  आणि दूसरे VXI  आहे. हे दोन्ही मॉडल पेट्रोल आणि CNG सोबतही वेगवेगळे येतात. याच्या STD मॉडलची दिल्ली एक्स-शोरुम प्राइज 2.53 लाख रुपये आणि LXI CNG ची एक्स-शोरुम प्राइज 3.73 लाख आहे. कंपनीचा दावा आहे की, पेट्रोल वेरिएंटचे मायलेज 24.70kmpl आणि LXI CNG चे मायलेज 33.44  किलोमीटर आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...