Home | International | Other Country | Topper girl died after cocaine fuelled se*x at home in UK

ड्रग्स घेऊन करत होती हे घाणेरडे कृत्य, हृदयविकाराच्या धक्क्याने झाला तरुणीचा मृत्यू

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 09, 2018, 10:35 AM IST

वर्गात टॉपर राहिलेल्या या तरुणीने दहावीला 10 A प्लस मार्क मिळवले होते.

 • Topper girl died after cocaine fuelled se*x at home in UK

  इंटरनॅशनल डेस्क - ब्रिटनच्या बर्मिंघम येथील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या 17 वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. तिच्या मैत्रिणींनी पोलिसांनी दिलेल्या जबाबानुसार, आपल्या मित्र मैत्रिणींसोबत पार्टी करत असताना तिला हृदयविकाराचा झटका आला. तिला तातडीने रुगणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच रुगणालयात तिचे वडील सुद्धा एक अनुभवी सर्जन आहेत. परंतु, कुणीही तिला वाचवू शकले नाही. या घटनेनंतर मेडिकल रिपोर्ट आणि तिच्या मित्र-मैत्रिणींकडून जी माहिती समोर आली त्यावरून केवळ तिचे कुटुंबीयच नव्हे, तर अख्खे शहर हादरले आहे.

  अभ्यासात हुशार, पण...
  वर्गात टॉपर राहिलेल्या या तरुणीने दहावीला 10 A प्लस मार्क मिळवले होते. अभ्यासात चांगली असली तरीही प्रत्यक्षा वागण्यात ती तितकीच बिघडलेली होती असे तिच्या मैत्रिणी आणि शिक्षकांनी सांगितले आहे. गर्भश्रीमंत असलेली ही मुलगी वर्गात रोज ड्रग्स घेऊन यायची. कित्येकवेळा तिला हेड टीचरने सर्वांसमोर रागावले होते. तिच्यावर याचा काहीच परिणाम होत नव्हता. एकदा तर तिला शाळेतून काढण्याची नोटीस देखील देण्यात आली होती. पण, अभ्यास चांगली असल्याने शाळेने तिला माफ करून तिच्या चुकांवर दुर्लक्ष केले.


  कोकेन घेऊन सेक्स करताना आला हार्ट अटॅक
  वर्गातील मैत्रिणींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, घरात कुणीही नसताना ती पार्ट्या करायची. 1 ऑगस्टच्या रात्री सुद्धा तिने असेच केले. कोकेन आणि ड्रिंक्सचा ओव्हरडोज घेतला. नशेत असतानाच तिने एका 19 वर्षांच्या मुलासोबत शारीरिक संबंध बनवले. याच दरम्यान तिचा हार्ट फेल झाला आणि ती जागीच कोसळली. डॉक्टर आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिच्या तोंडातून रक्त वाहत होते. सुरुवातीला पोलिसांनी त्या युवकाला अटक केली. यानंतर तिचे वडील सर्जन असलेल्या रुग्णालयातूनच धक्कादायक मेडिकल रिपोर्ट आला. त्यामध्ये मुलीच्या शरीरात भरमसाठ प्रमाणात कोकेन सापडले. यानंतर पोलिसांनी संबंधित युवकाची सुटका केली. दरम्यान, आपली मुलगी ड्रग्स तर सोडा दारुला सुद्धा हात लावत नाही असा दावा तिच्या पालकांनी केला आहे.

 • Topper girl died after cocaine fuelled se*x at home in UK
 • Topper girl died after cocaine fuelled se*x at home in UK

Trending