Monsoon / मान्सून पुन्हा सक्रीय : मुंबईत मुसळधार, राज्यात पावसाचा इशारा; मुंबई, रायगड, ठाण्यात रेड अलर्ट

 पाच ते आठ सप्टेंबर या काळात राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे

Sep 05,2019 08:11:50 AM IST

औरंगाबाद - राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, बुधवारी पावसाने मुंबईला झोडपून काढले. कोकण-विदर्भासह राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पाच ते आठ सप्टेंबर या काळात राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

राज्यभर अलर्ट
> ५ ते ८ सप्टेंबर या काळात कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
> द. महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

> मुंबईत बुधवारी ठिकठिकाणी १०० ते ३०० मिमी पावसाची नोंद झाली.

> बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सरकलेला मान्सूनचा आस आणि कोकण किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.

रेड अलर्ट : मुंबई, रायगड, ठाणे : या जिल्ह्यांत २०० मिमी पेक्षा जास्त पावसाची शक्यता

ऑरेंज अलर्ट : नाशिक, सातारा, पुणे : ११५ ते २०० मिमीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता.

यलो अलर्ट : बीड, हिंगोली, नांदेड, नंदुरबार, विदर्भ : ६४.५ ते ११५.५ मिमीपर्यंत पाऊस शक्य

ग्रीन अलर्ट : औरंगाबाद, नगर, सोलापूर, जालना, उस्मानाबाद, जळगाव, लातूर : १५ ते ६४.५ मिमीपर्यंत पाऊस शक्य.

X