Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Torture on women increased; Congress State President Chavan criticized

बेटी बचावचा फक्त नारा, महिलांवर अत्याचार वाढले; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची टीका

प्रतिनिधी | Update - Sep 05, 2018, 11:05 AM IST

बेटी बचाव, बेटी पढाव हा सरकारचा नुसताच नारा आहे. राज्यात प्रत्यक्षात महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे.

 • Torture on women increased; Congress State President Chavan criticized

  सोलापूर- बेटी बचाव, बेटी पढाव हा सरकारचा नुसताच नारा आहे. राज्यात प्रत्यक्षात महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. अशातच सत्ताधारी पक्षाचे आमदार राम कदम यांनी महिलांविषयी अनुद््गार काढून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांचे वक्तव्य लोकप्रतिनिधीला न शोभणारे असून, विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्यावर कारवाई करावी. भाजपने राज्यातील संपूर्ण महिलांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.


  शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, बेरोजगारी, इंधन दरवाढ, महागाई, महिलांवरील अत्याचार, कायदा व सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा ही राज्यातील स्थिती पाहता राज्यात सरकार काय करत आहे? असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. संपूर्ण राज्यच संघर्षातून जात असल्याने काँग्रेसला सरकारविरोधात संघर्ष यात्रा काढून लक्ष वेधावे लागले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


  काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी सरकारच्या सुमार कामगिरीवर तोफ डागली. राज्यात एकही घटक सरकारच्या चार वर्षांतील कामगिरीवर समाधानी नाही. उर्वरित पान १०


  कर्जबाजारीपणा आणि आधारभूत किंमत मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतीमालाच्या किमान आधारभूत किमतीचा पुरता बोजवारा उडाला आहे. शेती संकटात सापडलेली असतानाही सरकार केवळ नवनवीन योजना जाहीर करीत आहे. चार वर्षांत बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. रोजगार मिळत नसल्याने तरुणवर्गही सरकारवर नाराज असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.


  माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार प्रणिती शिंदे, निर्मलाताई ठोकळ, प्रकाश यलगुलवार, विश्‍वनाथ चाकोते, काँग्रेसचे प्रभारी मोहन जोशी, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले, बाळासाहेब शेळके आदी उपस्थित होते.


  सनातनवर बंदी आणू शकलो नाही...
  सनातन संस्था ही दहशतवादी संघटना असून, काँग्रेस सरकारच्या काळात या संस्थेवर बंदी आणू शकलो नाही, अशी कबुली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबतचा प्रस्ताव पुराव्यासह केंद्र सरकारकडे पाठवला होता. मात्र तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आणखी काही कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. यात वेळ गेला आणि निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. नंतर सत्ता गेली. त्यामुळे आम्ही सनातनवर बंदी घालू शकलो नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Trending