आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑकलँड : या वर्षी टी-२० विश्वचषक असल्याने सर्वांचे लक्ष क्रिकेटच्या छोट्या प्रकाराकडे वळाले आहे. गेल्या वर्षी टीम इंडियाने कसोटीत आपला दबदबा राखला होता. आता वेळ टी-२० ची आहे. भारतीय खेळाडू ११ हजार ९६५ किमीचा प्रवास करून न्यूझीलंडला पोहोचले. एका दिवसाचा आराम करत आता ते न्यूझीलंडला आव्हान देण्यासाठी सज्ज झाले. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्या घरात आपण विशेष कामगिरी करू शकलो नाही. टी-२० मध्ये न्यूझीलंड नेहमी टीम इंडियाच्या वरचढ ठरला. अशात विराट कोहली व कंपनीला जुने सगळे विक्रम मोडण्याची संधी आहे. अशात टीम इंडिया पहिल्यांदाच ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. सोबतच कर्णधार कोहलीदेखील पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये टी-२० खेळेल. त्यांच्यासाठी ही टी-१० मालिका कठीण राहील.
त्याची दोन कारणे आहेत
न्यूझीलंड तो संघ आहे, ज्यांच्याविरुद्ध टी-२० मध्ये भारताची विजयी सरासरी सर्वात कमी आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध ११ सामन्यांपैकी केवळ ३ जिंकले. दुसरे कारण - न्यूझीलंडच्या वातावरणाशी आपले खेळाडू समतोल साधू शकत नाहीत. तेथेही आमची विजयी सरासरी कमी आहे. आपण ५ पैकी केवळ एक सामना जिंकला. हा विजय गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ऑकलंडच्या मैदानावर मिळाला होता.
संघाच्या व्यग्र कार्यक्रमावर कोहलीने म्हटले - खेळाडू स्टेडियमवर लँड करतील व सामना खेळतील
टीम इंडियाच्या व्यग्र कार्यक्रमावर कर्णधार विराट कोहलीने चिंता व्यक्त केली. कोहलीने म्हटले की, तो दिवसदेखील येईल, खेळाडू थेट स्टेडियमवर लँड करतील व सामना खेळतील. भारताने १९ जानेवारीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरची वनडे मालिका संपवली आणि त्यांच्या ५ दिवसांनंतर न्यूझीलंडमध्ये टी-२० मालिका सुरू होत आहे. भारत व न्यूझीलंड टीम विश्वचषक उपांत्य फेरीनंतर पहिल्यांदाच समोरासमोर येईल. कोहलीने म्हटले खेळातील दबाव समोर दिसत आहे. भारतापेक्षा ७ तासांनी वेगळा वेळ असलेल्या ठिकाणी जाणे, तेथील परिस्थितीशी जुळवून घेणे कठीण जाते. या सर्व गोष्टींवर भविष्यात लक्ष दिले जाईल, त्याबाबत मला अाशा वाटते. आम्ही न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी उत्साहित आहोत. या वर्षी विश्वचषक खेळायचा आहे, त्यामुळे टी-२० महत्त्वाचे आहे.' त्याने कोहलीने अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.