Home | Business | Business Special | tour packages for bachelor girls

लग्नापूर्वी तरुणीही करू शकतात मैत्रिणींसोबत बॅचलर पार्टी, 15 हजारांपासून सुरू होतात पॅकेज...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 05, 2018, 03:55 PM IST

कित्येक कंपन्या मुलींसाठी खास करून बॅचलर मुलींसाठी ट्रिपचे पॅकेजेस देत आहेत.

 • tour packages for bachelor girls

  बिझनेस डेस्क - खास मैत्रिणीच्या लग्नाची तयारी करताय? यात ऑल गर्ल्स बॅचलर पार्टीचा विचार आहे? तर येथे आपल्याला त्यासंदर्भात परीपूर्ण माहिती मिळेल. विविध कंपन्या खास मुलींची सेफ्टी लक्षात घेऊन खास मुलींच्या बॅचलर पार्ट्या आणि टूर पॅकेज देत आहेत. जाणून घेऊयात अशाच काही पॅकेजेसविषयी.

  मुलींच्या टूरसाठी कोणत्या गोष्टी असतात जास्त महत्वाच्या...
  कोक्स अॅन्ड किंगचे अधिकारी थॉमस यांनी सांगितले, की या ट्रिप फक्त मुलींसाठी तयार केल्या जातात. यामध्ये मुलींच्या सुरक्षिततेपासून त्यांचे खाणे-पिणे त्यांची लाईफ स्टाईल या सर्वांचा विचार केला जातो. या पॅकेजेसमधील हॉटेल्स शहरातच असतात आणि स्पा, शॉपिंग ,फूड अशा बऱ्याच सोयी असतात. स्पामध्ये एक सेशन मोफत असते. या पॅकेजेसमध्ये पब्स आणि बारचाही समावेश असतो.

  गोवा
  भारतात गोव्याला ट्रीपसाठी जास्त प्राधान्य दिले जाते. हे ठिकाण कोणत्याही पार्टीसाठी आणि बॅचलर पार्टीसाठी खूप परफेक्ट आहे. येथील बीच, कसिनो, नाईट क्लब, पब्ज, रेस्तराँ आणि हॉटेल सहज मिळतील. येथे वॉटर स्पोर्टचेही पर्याय उपलब्ध आहे.
  पॅकेज - दोन रात्री तीन दिवस
  पॅकेजची किंमत - 15000 ते 20000 रुपये
  पॅकेज मधील सुविधा - येण्या जाण्याचे विमानाचा खर्च, हॉटेल आणि ब्रेकफास्ट

  आणखी पॅकेजेससाठी पाहा पुढील स्लाईड...

 • tour packages for bachelor girls

  पुद्दुचेरी
  पुद्दुचेरीचे सुंदर हेरिटेज, लँडस्केप आणि फ्रेंच कॅफे खूप प्रसिद्ध आहेत. बॅचलर पार्टीसाठी ही जागा खूप छान आहे. येथील बीच रेस्तरॉ आणि बिअर प्रसिद्ध आहे. ही तुमच्या बजेटमध्ये होणारी ट्रिप आहे.
  पॅकेज - दोन रात्री तीन दिवस 
  पॅकेजची किंमत - 20,000 रुपये 
  पॅकेज मधील सुविधा - येण्या-जाण्याचे विमानाचे खर्च, हॉटेल आणि ब्रेकफास्ट

   

  बाली

  इंडोनेशियाच्या बालीमध्ये जगातील सर्वात सुंदर बीच आहेत. ही खूप शांत आणि सुंदर जागा आहे. हे भारतात हनिमून डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी गर्ल्स ट्रिपसुद्धा प्लॅन केली जाऊ शकते. टूर कंपन्या येथील ट्रीपसाठी खूप पॅकेजेस देत आहेत. 
  पॅकेज - पाच दिवस चार रात्री 
  पॅकेजची किंमत - 60,667 रुपये. 
  पॅकेज मधील सुविधा - येण्या जाण्याचे विमानाचा खर्च, हॉटेल आणि ब्रेकफास्ट

   

  आणखी पॅकेजेससाठी पाहा पुढील स्लाईड...

 • tour packages for bachelor girls

  दुबई 
  दुबईला शॉपिंग हब म्हणून ओळखले जाते. येथे रेडिमेड गारमेंट्सपासून ज्वेलरीचेही खूप पर्याय उपलब्ध आहेत. दुबईमध्ये पाम ट्री, बुर्ज खलिफा, बीच आणि नाईट सफारी यांसारखी ठिकाणे आहेत. येथे स्पा आणि वेलनेससाठीही खूप पर्याय उपलब्ध आहेत. 
  पॅकेज - पाच दिवस चार रात्री 
  पॅकेजची किंमत - 85,265 रुपये प्रति व्यक्ती. 
  पॅकेज मधील सुविधा - येण्या जाण्याचे विमानाचा खर्च, हॉटेल आणि ब्रेकफास्ट

Trending