अरब देशात टुर्सचे / अरब देशात टुर्सचे आयोजन, पर्यटकांना लाखो रुपयांचा गंडा

Feb 02,2019 10:52:00 AM IST

नाशिक : अरब देशातील उमराह, सौदी मध्ये टूर्स आयोजित करत पर्यटकांकडून प्रत्येकी १ लाख ८८ हजार रुपये घेत ऐनवेळी टूर्स रद्द झाल्याचे सांगत पर्यटकांची फसवणूक केल्या प्रकरणी ताज इंटरनॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल चे संचालक सैफ अकबर पठाण यांच्यासह दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.


पोलिसांनी दिलेली माहिती शाहिन अली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित सैफ अकबर पठाण, अकबर हमजा खान पठाण, सुफी यान जावेद बागवान यांनी ताज इंटरनॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल पखाल रोड येथे १० ऑक्टोबर २०१८ रोजी ट्रॅव्हल कंपनीकडून उमराह, सौदी अरब देशात टूर्स आयोजित केली होती. कंपनीच्या वतीने पॅकेज मध्ये विविध आमिष दाखवत विश्वास संपादन केला. सहली साठी प्रत्येकी १ लाख ८८ हजार रुपये चेकद्वारे घेतले. अशाच प्रकारे पंचवीस ते तीस नागरिकांनी चेकद्वारे पैस दिले. लवकरच टूर्स जाणार असल्याने अली यांच्यासह इतरांनी सर्व तयारी केली होती. मात्र संशयितांनी ऐनवेळी टूर्स रद्द झाल्याचे सांगत पैसे वाढवून मागितले. तसेच भरलेले पैसे देण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संशयितांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ तपास करत आहे.

X