आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटकांच्या लाेंढ्याने निसर्ग साैंदर्याची धूळधाण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलका कौशिक


आधुनिक पर्यटकांनी पर्यटन विश्वात धुमाकूळ माजवला अाहे. काही वर्षापूर्वी एव्हरेस्ट तळावरील शिबिरापासून ते एव्हरेस्ट शिखरापर्यंतच्या दुर्गम मार्गावर कशा पद्धतीने 'ट्रॅफिक जाम' झाला हाेता, हे अाठवतं का? गेल्या उन्हाळ्यातील गढवालचे दृश्य तर अगदी ताजे अाहे. चारधाम यात्रेचा प्रसाद घेण्यासाठी निघालेले जथ्थेच्या जथ्थे अाणि बेफाम धावणाऱ्या एसयूव्हीच्या अाेझ्याने उत्तराखंडच्या पठारांची दमछाक हाेत हाेती. चारधामचा मार्ग प्रशस्त करण्याच्या याेजनेने त्यात अाणखी भर घातली. हा प्रकल्प राबवण्यापूर्वी न पर्यावरणवाद्यांची भूमिका समजून घेतली अथवा येथल्या डाेंगरदऱ्यांचे कण्हणे एेकून घेतले. परिणामी, कित्येक दिवस हृषीकेशपासून गंगाेत्री-यमुनाेत्रीपर्यंतचा मार्ग कारच्या अाेझ्याने बेहाल झाला हाेता.


गढवाल ते जंस्कारपर्यंतच्या डाेंगररांगांची विचारपूस करणाराही कुणी नाही. त्यामुळे त्याची चाळण करण्याचा जाे-ताे प्रयत्न करीत राहिला. तात्पर्य, पर्यटनाचा अतिरेकी हव्यास अाम्हाला काेठे घेऊन जात अाहे, हा चिंतेचा विषय अाहे. मनाली, कसाेल, सिमला यांसारख्या हिल स्टेशनची जी धूळधाण झाली अाहे, त्यापासून अाम्ही काय बाेध घेतला अाहे? केदारनाथच्या जलप्रकाेपानंतरही नदीमार्गात झालेली अतिक्रमणे, नदीकिनारी पुन्हा उभी राहिलेली घरे-दुकाने अाणखी काेणत्या विनाशाची बीजे राेवत अाहेत? कदाचित थायलंड, स्पेन, इटलीमध्ये पर्यटनाच्या अतिरेकामुळे काही 'हाॅट डेस्टिनेशन'ची हानी झाली, ताेच कित्ता अापल्याकडे गिरवला तर जात नाही?


लिओनार्दाे दा कॅप्रियाेच्या 'द बीच' या चित्रपटामुळे बहुचर्चित ठरलेले थायलंडमधील माया बे हे पर्यटन स्थळ २०१८ मध्ये पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात अाले हाेते. नैसर्गिक संसाधनांची नवनिर्मिती झाल्यानंतर पर्यटकांसाठी पुन्हा खुले केले जाईल, असे त्या वेळी सांगण्यात अाले हाेते. अाता त्यास दाेन वर्षे झाली अाहेत. पर्यावरण, वन अाणि पर्यटन संस्थांच्या मते माया बे काही वर्षांपासून पर्यटकांच्या वाढत्या वर्दळीचा बळी ठरला अाहे. म्हणून तेथील वर्दळ अाता बंद ठेवण्यात अाली अाहे. स्पेनमधील बार्सिलाेनात जेव्हा-तेव्हा 'ट्रॅव्हलर्स गाे बॅक' किंवा 'वी डाेन्ट वाॅन्ट टुरिस्ट' सारख्या घाेषणा कानी पडत असतात. 'मलाेरका'मध्ये पर्यटकांच्या विराेधात जाेरदार निदर्शने झाली अाहेत. इटलीच्या मिलान, राेम, फ्लाेरेन्स, व्हेनिससारखी शहरेदेखील पर्यटकांच्या गर्दीने त्रस्त अाहेत. नव्या तंत्रज्ञानाने पर्यटन अधिक सुलभ केले, इतकेच नव्हे तर त्याचे स्वरूपदेखील बदलून टाकले अाहे. अाता रेस्टाॅरंट अाणि खाद्यपदार्थ 'इन्स्टाग्रामेबल' झाले अाहेत. मुक्कामी स्थळे 'फेसबुक चेक-इन'वर अाली अाहेत. त्यामुळे अाता पर्यटन हे शहरांच्या सीमेपासून ते मैलाेन््मैल लांब 'ट्रॅफिक जाम'च्या वळणावर येऊन ठेपले अाहे. जाे प्रवास स्वत:ला स्वत:चीच भेट घडवायचा, अाेळख करून द्यायचा ताे लुप्त झाला असून त्याची जागा व्हॅकेशन-हाॅलिडेसारख्या ग्लॅमरने घेतली अाहे. मिलेनियल ते हॅशटॅग अाणि जनरेशन झेडपर्यंत असा पर्यटनाचा प्रवास झाला. तथापि, अस्वस्थता, दिखाऊपणा, स्पर्धा, अडचणी-संकटे हल्ली अधिक प्रमाणात पाहायला मिळतात.


सातत्याने अाकारमानाने वाढत चाललेले खिसे, क्रेडिट कार्डच्या बळावर हाेणाऱ्या पर्यटनाने उपभाेक्तावादाला खतपाणी घातले. नाेे-फ्रिल्स एअरलाइन्सच्या जमान्यात प्रवाशांचे कार्बन फुटप्रिंट वाढले अाहेत. अापल्या घरची पाेळी-भाजी, पाण्याची बाटली साेबत घेऊन जाणे हे मागासलेपणाचे लक्षण ठरले असून अाता अॅपवरून जेवण मागवणे, पाण्याची बाटली खरेदी करणे ही अाधुनिकतेची अाेळख बनली अाहे.


डाेंगरदऱ्यांमध्ये बिअरच्या कॅन, प्लास्टिकच्या बाटल्या दिसणे ही सामान्य बाब झाली अाहे. म्हणूनच पर्यटकांना संवेदनशील बनवणे जेवढे अावश्यक; तितकेच पर्यटनाला नियंत्रित ठेवणेही गरजेचे ठरते अाहे. पर्यटकांची संख्या निश्चित असावी, नाेंदणी अनिवार्य करावी, कुठलीही पूर्वतयारी अाणि माहिती नसताना 'हाय अल्टिट्यूड टुरिझम'वर निघण्याची भारतीयांची जी सवय अाहे तिला वेसण घालणे अावश्यक अाहे. तीर्थक्षेत्रांना हेलिकाॅप्टरसारख्या ग्लॅमरपासून शक्य तितके दूर ठेवले पाहिजे. तीर्थक्षेत्र, सराेवर, वन, डाेंगरदऱ्या, नदीनाल्यांची काळजी अापण अाज घेऊ शकलाे तर नव्या पिढीला ही रम्य स्थळे पाहायला मिळतील. टिकाऊ पर्यटनाचा मार्ग सामान्यत: जबाबदार पर्यटकाद्वारे जाताे.


अन्य देशांमध्ये ज्याप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता, अाभासी वास्तवाच्या मदतीने लाेकांना पर्यटनाचा अानंद घडवला जाताे, त्या पद्धतीने अाभासी पर्यटनाच्या माध्यमातून घसबसल्या पर्यटनाचा अानंद लुटण्याची व्यवस्था करता येऊ शकते. अलास्काचे बर्फाळ डाेंगर, अंटार्क्टिकातील विलाेभनीय दृश्ये अादी पर्यटन स्थळांसाेबतच नासाच्या मदतीने अंतराळ अाणि ग्रहांपर्यंतचा राेमांचक प्रवासही घडवला जाऊ शकताे. त्यासाठी गुगल अर्थचे याेगदान अधिक महत्त्वाचे ठरते. अाभासी पर्यटनामुळे वास्तवाचा अानंद मिळणार नाही, हे खरे असले तरी फालतू गर्दी-गाेंगाट टाळता येऊ शकताे. प्रवाशांचे नियंत्रण, संवेदनशील स्थळांवर नाेंदणी अाणि अति संवेदनशील ठिकाणी व्हीअार टेक्नाॅलाॅजीसारखे अनेकविध उपाय जबाबदार पर्यटन साकार करू शकतात.


अलका कौशिक
पर्यटन पत्रकार