Ajintha / अजिंठा येथील धबधब्याच्या २०० फूट खोल कुंडात पडला पर्यटक; २ तासांच्या प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढले

दोनशे फूट खोल कुंडात  अडीच तास अडकून पडला होता पर्यटक 

प्रतिनिधी

Aug 23,2019 07:37:00 AM IST

फर्दापूर - अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेला पर्यटक अशोक भाऊसाहेब होलगुंडे (रा. बांद्रा ईस्ट, खेरवाडी मुंबई) हे गुरुवारी दुपारी सातकुंडावरील धबधब्यात पाय घसरून पडला. तो दोनशे फूट खोल कुंडात घरंगळत केला. अडीच तास तो कुंडातच अडकून पडला.

लाेक धावले :

ताे वाचवण्यासाठी आरडाओरड करत होता. काही वेळानंतर सलमान खान गैसखान (रा. रिठी ता. कन्नड) हा पर्यटक आवाजाच्या दिशेने गेला. त्याने कुंडात एक पर्यटक पडल्याचे लोकांना सांगितले. त्यानंतर लेणापूर गावचे नागरिक, लेणीतील कर्मचारी, पोलिस मदतीला धावले.

सुखरूप वर काढले :

भारत काकडे, विजय जाधव, राजू बनसोडे, सलीम शहा, योगेन मोहिते, पो.काॅ. सय्यद, ज्ञानेश्वर सरळताळे, केंदळे, शिवाजी पवार, भगवान साठे आदींनी दोरीच्या साहाय्याने त्यास सुखरूप वर काढले.

X
COMMENT