आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटकाने ऑनलाइन बुक केली रुम, तिथे गेल्यावर दिसले हे...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅम्सटर्डम(नेदरलंड)- ब्रिटनचा पर्यटक बेन स्पेलरने अॅम्सटर्डम येथे जाण्यासाठी एक रूम बुक केली होती. त्याने ऑनलाइन बुकिंग कंपनी एअरबीएनबी लॉजिंग्सद्वारे रूम बुक केली होती. हे हॉटेल सन ट्रॅव्हल कंपनीशी संबंधीत आहे. पण बेन तिथे पोहचल्यावर चांगलाच धक्का बसला. त्याला राहण्यासाठी रुम ऐवजी रस्त्याच्या कडेला ठेवलेले कार्गो कंटेनर देण्यात आले होते. पण नंतर, बुकिंग कंपनीने आपली चुक मान्य करून नुकसान भरपाई देऊन पैसे परत केले.


3 वेळेस कंटेनरजवळून गेला बेन
स्पेलरने रूमसाठी 100 पाऊंड (सुमारे 9 हजार रुपये) भरले होते. त्याने सांगितले की, 'एअरबीएनबी लॉजिंग्सने बुकिंगच्या वेळी प्रायव्हेट बाथरूमसोबत एक स्वच्छ रूम असल्याचे सांगितले होते.' पण प्रत्यक्षात वेगळीच रूम मिळाली. या घटनेनंतर बेनने फेसबक पोस्टमध्ये लिहले की, "माझी खूप मोठी चेष्टा झाली आहे. कंटेनरमध्ये जमिनीवर गादी ठेवली होती आणि चादर ठेवली होती तसेच एक छोटेसे बाथरूम होते. मी तीन वेळेस कंटेनरजवळून गेलो. जेव्हा मला कळले की हे कंटेनर राहण्यासाठी मिळाले आहे तर मला अजिबात विश्वास बसला नाही."


कंपनीने 20 हजार रूपये नुकसान भरपाई दिली
तक्रार केल्यानंतर एअरबीएनबी कंपनीने स्पेलरला फक्त पैसे परत केले नाही तर दुसऱ्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी 230 डॉलरसुद्धा (20 हजार रूपये) दिले. त्यानंतर एयअरबीएनबीने आपल्या यादीतुन सन ट्रॅव्हलचा प्रोफाइल काढून टाकला आहे. एअरबीएनबीनुसार, आम्ही कधीच चुकीची माहिती आमच्या प्लॅटफॉर्म ठेवत नाहित. आतापर्यंत आमच्या वेबसाइटवर सुमारे 50 कोटी लोकांनी भेट दिली आहे. दररोज 20 लाख लोक आम्हाला सर्च करतात. तसेच अशा प्रकारच्या घटना खूप कमी घडतात. या सर्व प्रकारामुळे त्या कंटेनरला तेथून उटलण्यात आले आहे. स्थानीक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कंटेनरला त्या ठिकाणी ठेवण्याची परवानगी नव्हती.

बातम्या आणखी आहेत...