आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटन थांबवून जहाजातील प्रवासी वादळग्रस्तांच्या मदतीला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वायव्य बहामास आणि आग्नेय अमेरिका व कॅनडात डोरियन वादळाचे थैमान माजले आहे. या भागात खूप जीवित व वित्तहानी झाली आहे. मात्र या भागात क्रूझवर पर्यटनासाठी निघालेल्या लोकांनी मोठे प्रेरणादायी काम केले. या लोकांनी प्रवासातील सात दिवस येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी घालवले. गेल्या आठवड्यात क्रूझ सेलिब्रिटी इक्विनोक्स हे फ्लोरिडाच्या फोर्ट लॉडरडेल येथून एका आठवड्याच्या सफरीसाठी निघाले. या जहाजावर ३ हजार पर्यटक होते. सात दिवसांनी हे जहाज नसाऊला पोहोचणार होते. डोरियन वादळ आल्यानंतर या लोकांनी एका बेटावर जहाज थांबवले. क्रू सदस्यांसह सर्वांनी आपला प्रवास गरजूंच्या मदतीसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दहा हजार लोकांसाठी सँडविच आणि पाण्याच्या बाटल्या जमवल्या. पर्यटकांची लहान मुलेही या मदतकार्यात सहभागी झाली. मुलांनी पूरग्रस्तांसाठी भावनिक ग्रीटिंग कार्डही तयार केले. हे पाहून इतर जहाजांवरील पर्यटकही या मोहिमेत सहभागी झाले. लोकांच्या मदतीसाठी बहमास पॅराडाइज क्रूझ लाइन, रॉयल कॅरेबियन, वॉल्ड डिस्ने आणि कार्निव्हल कॉर्पोरेशनसारखे ग्रुपही पुढे आले आहेत.  या लोकांनी बेटावरील लोकांना सुरक्षित स्थानी पोहोचण्यास मदत केली. तसेच आवश्यक सुविधा पुरवण्यासाठीही धावाधव केली. दरम्यान, युनिसेफनेही या आठवड्यात दीड टन जीवनरक्षक वस्तूंचा पुरवठा नसाऊला पाठवण्याची घोषणा केली. तसेच भरपूर पाण्याच्या बाटल्या व पाणी स्वच्छ करण्याच्या गोळ्या रेडक्रॉसपर्यंत पाठवल्या. अशा प्रकारे या पर्यटकांनी जगासमोर एक आदर्श निर्माण केला.

बातम्या आणखी आहेत...