Home | Business | Business Special | Tourist places in foreign

फिरायची आवड व नवा प्रयत्न करू इच्छित असाल तर ही ठिकाणे मजेदार ठरू शकतील

दिव्य मराठी नेटवर्क | Update - May 11, 2019, 10:31 AM IST

सुट्या घालवण्यासाठी लोक शोधत आहेत अनोखे ठिकाण...

 • Tourist places in foreign

  टूरिझम डेस्क - सध्या उन्हाळ्याच्या सुट्या सुरू झाल्या आहेत. अशात प्रत्येकालाच सुट्या नयनरम्य आणि थंड हवेच्या ठिकाणी घालविण्यााची इच्छा असते. निसर्गाच्या साधिन्यात सुट्या घालविण्याचा अनेकांचा मानस असतो. पण नेमके कोणते ठिकाणा योग्य राहील याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होतो. यासाठी आज आम्ही तुम्हाला परदेशातील काही मजेदार पर्यटनस्थळांविषयी सांगत आहोत.

  अंडर वॉटर म्युझियम, कॅन्कून
  पाण्याखालील या संग्रहालयात ४०० पेक्षा जास्त पुतळे आहेत. समुद्राच्या पृष्ठभागावर काउचवर बसलेल्या एका पुरुषाचा पुतळा आहे. पुतळ्याभोवताली मासे पोहताना दिसतात. हे दृश्य आश्चर्यजनक व अद््भुत असते. यातून आपणास वेगळा अनुभव मिळतो.

  आणखी पर्यटनस्थळांसाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा....

 • Tourist places in foreign

  पॅनकेक रॉक्स, न्यूझीलंड 

  न्यूझीलंडच्या  पापारोआ नॅशनल पार्कच्या पश्चिम किनाऱ्यावर पॅनकेक रॉक्स पाहता येईल. लाइमस्टोन व सँडस्टोन एकाच वेळी समुद्राच्या पृष्ठभागावर एकत्र आले होते. कारण, सँडस्टोन लाइमस्टोनपेक्षा नरम होता, त्यामुळे तो लवकर झिजू लागला.या प्रक्रियेसोबत मोठ्या दगडांनी पॅनकेक्सचे रूप घेतले.ही प्रक्रिया एक रात्रीतून नव्हे, तर सुमारे ३० दशलक्ष वर्षांपूर्वी झाली होती.

 • Tourist places in foreign

  अल्बरोबेलो, इटली
   

  १९९६ मध्ये अल्बरोब्लोचा ‘ट्रूली' वर्ल्ड हेरिटेज साइट झाली होती. १४  व्या शतकात स्थापन इटलीतील या छोट्याशा शहरास काउंट ऑफ कॉन्वर्सेनो यांनी वसवले होते. या शहरातील सर्व घरे "ट्रूली' आहेत. "ट्रूली' लाइमस्टोनपासून तयार कोनाच्या आकाराचे घर असते. बांधकामात दगडांचा वापर केला जात होता, तेव्हा ते तयार झाले. येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात.

 • Tourist places in foreign

   अंडर-सी रेस्त्राँ, मालदीव्ज

  माशांसोबत डिनर करण्याची इच्छा असेल तर ही चांगली जागा आहे.कॉनरॅड मालदीव्ज एका बेटावर रिसॉर्ट तयार केले आहे. तिथे लंच व डिनर केले जाऊ शकते. हे रेस्त्राँ समुद्रापासून १६ फूट खाेल आहे. याचे छत आणि भिंत काचेच्या असून लोक आतमध्ये जेवताना समुद्रातील मनोरम्य दृ़श्य पाहू शकतात. येथे केवळ १२ आसने आहेत,त्यासाठी खूप आधी बुकिंग करावी लागते.
   

Trending