आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोममध्ये प्रशासनाने पर्यटकांसाठी बनवले कडक नियम, पुरुष शर्ट काढून फिरले तर भरावा लागणार दंड; फाउंटेनला तोंड लावून पाणी पिण्यावर बंदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोम - रोम येथील प्रशासनाने पर्यटकांच्या असामाजिक व्यवहारांवर अंकुश लावण्यासाठी कडक नियम बनवले आहेत. आता पर्यटकांना येथील ऐतिहासिक ट्रेव्ही फाउंटेनसोबत खेळता येणार नाही. आता येथे तोंड लावून पाणी पिणे आणि शर्टाचे बटन उघडून फिरण्यावर बंदी आणण्यात आणली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांना दंड भरावा लागेल. रोमच्या प्रशासनाने नुकतीच या नियमांना अनुमती दिली आहे. 


पर्यटकांच्या स्नॅक खाण्यावर अधिकारी ठेवणार नजर
 
पर्यटक रोममधील ऐतिहासिक इमारती आणि संगमरवरावर टोमॅटो सॉस आणि चीज सांडतात, त्यांना या गोष्टीचे थोडे देखील गांभीर्य नसते. यामुळे आता पर्यटकांच्या स्नॅक खाण्यावर अधिकाऱ्यांची नजर असणार आहे. प्रशासनाने सांगितले की, दरवर्षी येथे येणाऱ्या लाखो पर्यटकांच्या असामाजिक व्यवहारांवर अंकुश लावण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. 

 

> रोमचा ऐतिहासिक ट्रेव्ही फाउंटेन हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. या फाउंटेनमध्ये उतरून फोटो काढतात आणि पाणी पितात. पण आता असे करण्यावर रोख लावण्यात येणार आहे. याशिवाय पुरुष शर्ट काढून फिरताना दिसल्याचे आढळून आल्यास त्यांच्याकडून दंड आकारण्यात येणार आहे. सोबतच ऐतिहासिक स्मारकांवर लव लॉक लावणे अपराधाच्या कक्षेत येणार आहे. 

 

> रोमची महापैर व्हर्जीनिया रेग्गीच्या मते, त्या परदेशी दूतावासांना या नवीन नियमांशी परिचित करून देत आहे. जेणेकरून ते पर्यटकांना या नियमांची माहिती देतील. रेग्गीच्या मते काही नियम स्थानिक नागरिकांना देखील लागू होणार आहेत. जसे की, रस्त्याच्या मधोमध पसरलेल्या तारांवर कपडे वाळवणे आणि सार्वजनिक वाहनांमध्ये वाद्य वाजवणे यांवर बंदी आणण्यात येणार आहे.