आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Toyota, Honda Recall 61 Million Cars Due To Air Bag Error, Suspect Not To Open Air Bag In Case Of Accident

एअर बॅगमधील त्रुटीमुळे टोयोटा, होंडाने 61 लाख कार परत बोलावल्या, दुर्घटनेच्या स्थितीत एअर बॅग न उघडण्याची शंका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टोयोटाने जगभरातून 34 लाख गाड्या परत बोलावल्या, होंडाचा 24 लाख रिकॉल करण्याचा निर्णय
  • परत बोलावलेल्या गाड्या अमेरिकेत चालत होत्या, एअर बॅग अयशस्वी ठरताहेत
  • भारतात सध्या विकत असलेल्या या कंपन्यांच्या गाड्या रिकॉल यादीत नाहीत

​​​​​​टोकियो : जपानी कार कंपन्या टोयोटा व होंडाने ६० लाख कार परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. या कारमध्ये एअर बॅगशी संबंधित वेगवेगळ्या त्रुटी होत्या व यामुळे गाडीत प्रवास करणाऱ्या लोकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. टोयोटाने जगभरातून ३४ लाख कार रिकॉल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी २९ लाख गाड्या अमेरिकेतून रिकॉल केल्या जात आहेत. टोयाेटाच्या गाड्या २०११ पासून २०१९ पर्यंत विकलेल्या कोरोला गाडीचे काही मॉडेल, २०११ ते २०१३ पर्यंत विकलेल्या मॅट्रिक्स, २०१२ ते २०१८ पर्यंत विकलेल्या एवलॉन आणि २०१३ ते २०१८ पर्यंत विकलेल्या एवलॉन हायब्रीड कारचा समावेश आहे. टोयोटाच्या गाड्यांत झेडएफ- टीआरडब्ल्यूद्वारे बनवलेल्या एअर बॅग आहेत. त्यासाठी इलेक्ट्रिक इंटरफेसमध्ये त्रुटी आहेत.

होंडाने अमेरिका आणि कॅनडातून २७ लाख गाड्या बोलावल्या, यामध्ये बहुतांश सेडान कारचा समावेश

होंडा मोटर्सने अमेरिका आणि कॅनडाच्या बाजारातून आपल्या २७ लाख गाड्या बोलावल्या अाहेत. यामध्ये टकाटा एअर बॅग इन्फ्लेटर होते. मात्र त्रुटीमुळे जगभरातील वेगवेगळ्या अपघातात २५ जणांचा मृत्यू झालेल्या एअर बॅगचे हे मॉडेल नाही. होंडा आणि टोयोटा दोन्हींनी २१ जानेवारीला एअर बॅगमध्ये त्रुटी असणाऱ्या बॅगच्या गाड्या बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. परत बोलावलेल्या होंडाच्या गाड्यांत १९९८-२००० ची एकाॅर्ड कोप आणि सेडान, १९९६-२००० ची सिविक कोप आणि सेडान, १९९७-२००१ ची सीआरव्ही १, १९९८-२००१ ची ओडिसी आणि १९९७-१९९८ ची ईव्ही प्लसचा समावेश आहे. होंडाने म्हटले की, जोखीम खूप कमी तरीही रिस्क घेणार नाहीत.

जोखीम खूप कमी, पण रिस्क नाही घेणार : होंडा

होंडाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, एअरबॅग परफॉर्म न करण्याचा धोका खूप कमी आहे. असे असतानाही कंपनी कोणती जोखीम घेऊ इच्छित नाही. त्यामुळे खास मॉडेलच्या एअर बॅग ज्या गाड्यांत लावल्या आहेत त्या रिकॉल केल्या जात आहेत. कारमालकांना याबाबत मार्चच्या मध्यात अधिसूचित केले जाईल. मात्र बदलणारा भाग वर्षभर उपलब्ध होणार नसल्याचेही सांगितले जाते.

ह्युडे, किया, फियाटने गाड्या बोलावल्या, १.२३ कोटी कार तपासणीच्या फेऱ्यात

एअर बॅग न उघडण्याच्या कथित प्रकरणांत चार मृत्यू ह्युंडे-किया वाहनांच्या आणि तीन मृत्यू फियाट क्रिसलर गाड्यांच्या अपघातात झाले होते. २०१७ च्या मार्चमध्ये अमेरिकेतील नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशनने झेडएफ- टीआरडब्ल्यू एअर बॅगची तपासणी सुरू केली होती. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात चौकशीचे कार्यक्षेत्र वाढून १.२३ कोटी गाड्यांपर्यंत केले होते. यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची २०१० ते २०१९ पर्यंत तयार काही गाड्यांच्या मॉडेलचा समावेश असल्याचे सांगण्यात येते.

  • इकडे भारतात टाटाची नवी कार, मारुतीचे यश

टाटाने लाँच केली अल्ट्रोज कार, किंमत ५.२९ ते ९.३९ लाख रुपये

नवी दिल्ली : टाटाने कॉम्पॅक्ट अल्ट्रोज कार बुधवारी लाँच केली. टाटा अल्ट्रोज ५ प्रकारात एक्सई, एक्सएम, एक्सटी, एक्सझेड आणि एक्सझेड(ओ)मध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायासोबत उपलब्ध आहे. कंपनीने यासाठी पाच रंगाचे पर्याय दिले आहेत. बेस व्हेरियंटची किंमत ५.२९ लाख रु., टॉप व्हेरिएंटची किंमत ९.३९ लाख रु. आहे. कंपनी कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन २०२१ मध्ये लाँच करण्याची शक्यता आहे.

मारुती सुझुकीने १० महिन्यांत विकल्या ५ लाखांवर बीएस६ कार

नवी दिल्ली : मारुती सुझुकीने १० महिन्यांत ५ लाखापेक्षा जास्त बीएस६ कार विकल्या आहेत. मारुतीने एप्रिल २०१९ मध्ये पहिली बीएस६ मानकाचे मॉडेल सादर केले होते. कंपनीने एप्रिल २०१९ मध्ये पहिली बीएस६ मानकाची बलेनो हॅचबॅक आणली होती. सध्या कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये १० मॉडेल बीएस६ मध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये ऑल्टो, सेलेरियो, स्विफ्ट, व्हॅगनआर, बलेनो, डिझाइन, एस्प्रेसो, आर्टिगा, एक्सएल६ आणि इकोचा समावेश आहे.